Photo Credit: Motorola
Motorola या स्मार्टफोन कंपनीने गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी युरोपीय बाजारपेठांमध्ये आपल्या G सिरीज मधले दोन स्मार्टफोन म्हणजेच Moto G55 5G आणि Moto G35 5G लॉन्च केले आहेत. या दोन्ही स्मार्टफोन्सना एकत्रितपणे लॉन्च करण्याचा कंपनीचा उद्देश म्हणजे या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये आणि किंमत यामध्ये फार जास्त अंतर नसले तरीसुध्दा Moto G35 हा एक एन्ट्री लेव्हलचा स्मार्टफोन आहे आणि Moto G55 या स्मार्टफोनची गणना ही, मध्यम श्रेणीतील स्मार्टफोन्स मध्ये केली जात आहे. चला तर मग बघुया, लॉन्च झाल्यानंतर काय आहेत या दोन्ही स्मार्टफोनच्या किंमती, वैशिष्ट्ये आणि उपलब्धता.
Moto G55 5G या स्मार्टफोनची किंमत युरोपियन बाजारात 249 युरो इतकी आहे जी अंदाजे 24,000 भारतीय रुपये इतकी आहे. त्यासोबतच G सिरीजमधला दुसरा स्मार्टफोन म्हणजे Moto G35 5G हा एक स्वस्त आणि मस्त असा स्मार्टफोन असून त्याची किंमत 199 युरो इतकी आहे, जी अंदाजे 18,500 भारतीय रुपये इतकी आहे. हे दोन्ही स्मार्टफोन एकाच प्रकारामध्ये लॉन्च करण्यात आले आहेत, ज्यामुळे स्टोरेज किंवा रॅमच्या आधारे या स्मार्टफोनचे वेगवेगळे प्रकार पडत नाही आणि किंमत देखील बदलत नाही. Moto G55 5G हा स्मार्टफोन फॉरेस्ट ग्रे, स्मोकी ग्रीन आणि ट्वायलाइट पर्पल अशा तीन रंगांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. तर दुसरीकडे, Moto G35 5G, लीफ ग्रीन, पेरू रेड, मिडनाईट ब्लॅक आणि सेज ग्रीन या चार रंगांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.
Moto G55 5G हा एक माध्यम श्रेणीतील स्मार्टफोन असून हा Android 14 चे समर्थन करतो. या स्मार्टफोन मध्ये 6.49 इंचाचा असून 120 Hz चा रिफ्रेश रेट आणि 1080 × 2400 पिक्सलचे रेजोल्युषन असलेला फुल HD+ डिस्प्ले बसविण्यात आला आहे. यामध्ये 450 ppi पिक्सेलची घनता आणि गोरिला ग्लासचे संरक्षण देखील देण्यात आले आहे. Moto G55 5G हा स्मार्टफोन Octa Core MediaTek Dimensity 7025 या प्रोसेसरद्वारे समर्थित असून 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज या एकाच प्रकारामध्ये मोडतो. या व्यतिरिक्त मायक्रो एसडी सह 1 TB पर्यंत या स्मार्टफोनची स्टोरेज क्षमता वाढवता येऊ शकते.
या स्मार्टफोनमध्ये दोन कॅमेऱ्यांचा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये OIS सोबत 50 मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स बसविण्यात आला आहे. त्यासोबतच 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सुध्दा देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी या स्मार्टफोनच्या उजव्या बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर सुद्धा आहे. Moto G55 5G या स्मार्टफोनमधील बॅटरी ही 5000 mAh ची असून 30 वॅटच्या चार्जिंग्जचे समर्थन करते. हा स्मार्टफोन बनविण्यात वेगन लेदरचा वापर करण्यात आला आहे, ज्याचे वजन 182 ग्रॅम इतके आहे.
Moto G35 5G या स्मार्टफोनचा डिस्प्ले 120 Hz च्या रिफ्रेश रेट सोबत 6.7 इंचाचा असून याची तेजस्विता ही 1000 nits पर्यंत वाढविण्यात येऊ शकते. हा स्मार्टफोन Unisoc T760 या चिपसेटद्वारे समर्थित आहे. स्टोरेज किंवा रॅमच्या आधारे या स्मार्टफोनचे कोणतेही वेगवेगळे प्रकार पडत नसून या स्मार्टफोनची रॅम ही 8 GB इतकी असून 128 GB स्टोरेज क्षमता आहे, जी मायक्रो एसडी सोबत 1 TB पर्यंत वाढविण्यात येऊ शकते. Moto G35 5G या स्मार्टफोनमध्ये G55 प्रमाणेच कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा सेन्सर देखील बसविण्यात आला आहे. त्यासोबतच सेल्फी काढण्यासाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा उपलब्ध आहे पण हा एक एन्ट्री लेव्हलचा स्मार्टफोन असल्याने यामध्ये OIS चे समर्थन उपलब्ध नाही. अति सुरक्षेसाठी या स्मार्टफोनच्या उजव्या बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर बसवण्यात आला आहे. या स्मार्टफोनची बॅटरी ही 5000 mAh ची असून 18 वॅटच्या चार्जींगचे समर्थन करते.
जाहिरात
जाहिरात