Photo Credit: Motorola
Motorola Razr 50D व्हाईट मार्बल फिनिशमध्ये उपलब्ध होण्यासाठी सूचीबद्ध आहे
Motorola Razr 50D हा स्मार्टफोन जपान मध्ये पुढील आठवड्यात लॉन्च होण्यासाठी सज्ज झाला आहे. मोटोरोला कडून अद्याप या नव्या फोल्डेबल फोन बद्दल माहिती देण्यात आलेली नाही. Japanese mobile operator NTT Docomo च्या वेबसाईट वर मायक्रोसाईट लॉन्च झाली आहे. त्यामधून फोनच्या लॉन्च तारखेबद्दल माहिती मिळाली आहे. तसेच किंमत आणि स्पेसिफिकेशनचे अंदाजही समोर आले आहेत. फोनच्या लिस्टिंग मध्ये डिझाईन आणि कलर्सची देखील माहिती समोर आली आहे. दरम्यान Motorola Razr 50D ची डिझाईन ही regular Razr 50 प्रमाणेच आहे. सध्या हा फोन भारतात उप्लब्ध आहे. फोनमध्ये 6.9-inch inner display आणि 3.6-inch cover screen आहे.
NTT Docomo च्या वेबसाईट नुसार, मायक्रोसाईट वर फोनची लॉन्च डेट, किंमत, प्री ऑर्डर्सची माहिती आणि अन्य स्पेसिफिकेशन्स यांची माहिती देण्यात आली आहे. लिस्टिंगनुसार, Motorola Razr 50D हा 19 डिसेंबरला लॉन्च होईल. फोनची किंमत JPY 1,14,950 असेल म्हणजेच भारतीय रूपयांमध्ये सुमारे 65,000.
JPY 2,587 देऊन म्हणजे भारतीय रूपयांमध्ये 1500 देऊन फोन खरेदी करता येऊ शकतो. हा मासिक हप्ता असेल. सध्या हा फोन प्री ऑर्डर्स साठी आहे. pre-purchase साठी तो 17 डिसेंबरला खुला होत आहे.
Motorola Razr 50D हा White Marble finish रंगामध्ये उपलब्ध असेल अशी लिस्टिंग नुसार माहिती आहे. clamshell-foldable फोनच्या कडा गोलाकृती असतील. हे डिझाईन Razr 50 प्रमाणे असेल. हे Motorola Razr 50 चे Docomo-exclusive modelआहे.
लिस्टिंगनुसार, फोनमध्ये ड्युअल सिम आहे. यामध्ये nano+eSIM असणार आहे. Motorola Razr 50D मध्ये 6.9-inch full-HD+ pOLED inner display त्याच्यासोबत Corning Gorilla Glass Victus आणि 3.6-inch outer screen असणार आहे. फोनच्या कॅमेर्याचा विचार करता त्यामध्ये 50-megapixel primary rear camera आणि 13-megapixel secondary sensor आहे. यामध्ये 32-megapixel selfie shooter देखील असणार आहे.
Motorola Razr 50D मध्ये 4,000mAh battery आणि सिंगल 8GB RAM + 256GB स्टोरेज कॉन्फ्युगरेशन असणार आहे. यासोबत IPX8-rated water-repellent build आणि stereo speakers with Dolby Atmos support असणार आहे. हा स्मार्टफोन 171x74x7.3mm आकाराचा आणि 187g वजनाचा असणार आहे.
Motorola Razr 50 model हा भारतामध्ये लॉन्च झाला तेव्हा 6.9-inch internal screen आणि 3.63-inch cover display सह आला. फोनमध्ये MediaTek Dimensity 7300X SoC आहे. त्यामध्ये ड्युअल रेअर कॅमेरा युनिट आहे. ज्यात 50-megapixel primary sensor आणि 13-megapixel ultra wide-angle camera आहे. इनर डिस्प्ले मध्ये 32-megapixel shooter सेल्फीसाठी आणि व्हिडिओ चॅटसाठी आहे. या फोनमध्ये IPX8-rated build आहे तर 4,200mAh battery आहे.
जाहिरात
जाहिरात