Motorola Edge 60 Neo सोबत पॉवरफुल Moto G06 आणि G06 Power देखील आले बाजारात

Motorola Edge 60 Neo मध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी एकदाच चार्ज करून 44 तास वापण्यास सपोर्ट करते.

Motorola Edge 60 Neo सोबत पॉवरफुल Moto G06 आणि G06 Power देखील आले बाजारात

Photo Credit: Motorola

मोटोरोलाने अद्याप स्मार्टफोनची उपलब्धता आणि किंमत याबद्दल पुष्टी केलेली नाही

महत्वाचे मुद्दे
  • Motorola Edge 60 Neo हा "stylish and lightweight" या थीमवर डिझाइन केलेला
  • Motorola Edge 60 Neo, Moto G06 Power,आणि Moto G06 हे उच्च श्रेणीतील ग्राह
  • Motorola Edge 60 Neo हा आपल्या वर्गातील एकमेव फोन आहे ज्यामध्ये डेडिकेटेड
जाहिरात

Motorola ने IFA 2025 मध्ये तीन नवीन मॉडेल्सचे अनावरण केले, ज्यात फ्लॅगशिप-लेव्हल पातळ आणि हलक्या डिझाइनपासून ते परवडणाऱ्या एंट्री-लेव्हल पर्यायांपर्यंत आहेत जे अपवादात्मक बॅटरी लाइफवर भर देतात आणि विविध बाजारातील गरजा पूर्ण करतात. Motorola Edge 60 Neo, Moto G06 Power,आणि Moto G06 हे उच्च श्रेणीतील ग्राहकांसाठी लक्ष्यित आहेत जे डिझाइन आणि कॅमेराला महत्त्व देतात, ज्यांना मनोरंजन हवे आहे आणि परवडणाऱ्या किमतीत व्यापक अनुभव हवा आहे अशांसाठी हे फोन्स उत्तम पर्याय असणार आहेत.Motorola Edge 60 Neo हा "stylish and lightweight" या थीमवर डिझाइन केलेला आहे, ज्यामुळे ते आपल्या वर्गातील सर्वात हलके मॉडेल ठरते. त्याच्या बॉडी डिझाइनमध्ये IP68/69 प्रोटेक्शन, Corning Gorilla Glass 7i, आणि MIL-STD-810H सर्टिफिकेशन आहे, ज्यामुळे प्रवासात आणि रोजच्या वापरासाठी सुरक्षित आहे. याचा 6.4 इंचाचा डिस्प्ले 3000 निट्सची पीक ब्राइटनेस देतो, जे उत्कृष्ट व्हिज्युअल क्वॉलिटी देतात. हे डिझाइन तीन Pantone-ब्रँडेड रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Motorola Edge 60 Neo हा आपल्या वर्गातील एकमेव फोन आहे ज्यामध्ये डेडिकेटेड टेलिफोटो लेन्स आहे, जो Sony LYTIA 700C सेंसर आणि ऑप्टिकल इमेज स्टेबलायझेशन (OIS) सोबत येतो. ट्रिपल लेन्स सिस्टिममध्ये वाइड-अ‍ॅंगल मॅक्रो, आणि 3x ऑप्टिकल झूम आहे, जे 30x सुपर झूम पर्यंत सपोर्ट करते. फ्रंट कॅमेरा 32 मेगापिक्सेल सेंसर आहे, जो सेल्फी आणि व्हिडिओसाठी उत्कृष्ट आहे. Moto AI इमेज एन्हान्समेंट इंजिन आणि इंटेलिजंट कलर करेक्शन टेक्नॉलॉजी सोबत, हा आपोआप एक्सपोजर, डिटेल आणि रंग सुधारतो, तसेच मल्टी-फोकस पोर्ट्रेट्स, डायनॅमिक बोकेह, आणि 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट करतो.

Motorola Edge 60 Neo मध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी एकदाच चार्ज करून 44 तास वापण्यास सपोर्ट करते. यात 68W वायर्ड फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे, जे फक्त 7 मिनिटांत एक दिवसाची बॅटरी लाइफ देऊ शकते, तसेच 15W वायरलेस चार्जिंगची सुविधा देखील आहे.

अधिककाळ मनोरंजनासाठी, Moto G06 Power मध्ये 7000mAh ची दमदार बॅटरी स्मार्टफोनमध्ये आहे, जी या कॅटेगरीमधील फोनमधील सर्वात मोठी बॅटरी मानली जाते. ही बॅटरी सुमारे 2.5 दिवस टिकू शकते आणि 28 तासांपर्यंत व्हिडिओ प्ले करू शकते. तसेच, ही बॅटरी 1000 चार्जिंग सायकल सोबत जुळवून घेऊ शकते.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Apple iPhone 17 Air च्या लॉन्चपूर्वी समोर आले अपडेट्स
  2. Apple iPhone 17 ‘Awe Dropping’ कार्यक्रम आज; महत्त्वाच्या घोषणांबाबत वाढली उत्सुकता
  3. iPhone 17 Pro मध्ये 8X झूम, प्रगत कूलिंग टेक्नॉलॉजी असणार? पहा अपडेट्स
  4. Apple Watch Series 11 आणि Ultra 3 मध्ये काय आहे खास? घ्या जाणून अपडेट्स
  5. Motorola Edge 60 Neo सोबत पॉवरफुल Moto G06 आणि G06 Power देखील आले बाजारात
  6. अवघ्या 5.9mm जाडीचा Nubia Air, 5000mAh बॅटरीसह ग्लोबल मार्केट मध्ये दाखल; पहा किंमत, डिझाईन कसे?
  7. iPhone 17 Pro च्या कूलिंग टेक्नोलॉजीमध्ये मिळणार मोठे अपडेट्स
  8. 15 सप्टेंबरला भारतात येणार Oppo F31 Series; डिझाईन, फीचर्स लीक
  9. आयफोन 17 सिरीज 9 सप्टेंबरला होणार लाँच; आयफोन 17 एअर ठरणार लक्ष्यवेधी, पहा अपडेट्स
  10. Oppo F31, F31 Pro, F31 Pro+ च्या डिझाईनची चर्चा; 7,000mAh बॅटरी च्या समावेशाचा अंदाज
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »