मोबाईल अलर्टने होणार शोधमोहीम वेगवान; हरवलेल्यांचा माग काढणे सोपे

NDMA चे मोबाईल अलर्ट सिस्टम हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी वापरले जाऊ शकते.

मोबाईल अलर्टने होणार शोधमोहीम वेगवान; हरवलेल्यांचा माग काढणे सोपे
महत्वाचे मुद्दे
  • NDMA चे मोबाईल अलर्ट सिस्टम हरवलेल्या व्यक्तींचा शोध
  • परिसरातील नागरिकांच्या मोबाईलवर फोटोसह अलर्ट पाठवण्याची योजना आहे.
  • फरार गुन्हेगार आणि दहशतवाद्यांची माहितीही मोबाईलवर त्वरित पाठवली जाऊ शकते
जाहिरात

स्मार्टफोन वापरकर्त्यांना गेल्या काही काळापासून दिवस आणि रात्रीच्या वेळी इमर्जन्सी अलर्ट संदेश मिळत आहेत आणि कदाचित तुम्हीही तुमच्या मोबाईल फोनवर असे अलर्ट पाहिले असतील. खरं तर, फुल-स्क्रीन नोटिफिकेशन आणि मोठ्या आवाजासह येणारे हे अलर्ट देशातील नागरिकांना हवामान, नैसर्गिक आपत्ती आणि इतर आपत्कालीन परिस्थितींबाबत सतर्क करण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. मात्र, या अलर्ट्सबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली, तर अनेकांना त्याचा फायदा देखील झाला. आता नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी (NDMA) आपल्या मोबाईल फोन ब्रॉडकास्ट अर्ली वॉर्निंग मेसेज सिस्टीममध्ये अनेक बदल करण्याची योजना आखत आहे. होय, मोबाईलवर येणारी ही वॉर्निंग सिस्टीम हरवलेली मुले, ज्येष्ठ नागरिक आणि इतर व्यक्तींना शोधण्यात मदत करणार आहे. तसेच ही प्रणाली गुन्हेगार आणि दहशतवाद्यांना पकडण्यातही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यास मदत

एनबीटीच्या अहवालानुसार, NDMA च्या मोबाईल फोन ब्रॉडकास्ट अर्ली वॉर्निंग मेसेज सिस्टीममध्ये असे फीचर समाविष्ट केले जाऊ शकते, ज्यामुळे हरवलेल्या व्यक्तींना शोधणे आणि गुन्हेगारांना पकडणे अधिक सोपे होईल. या प्रणालीअंतर्गत एखादी व्यक्ती हरवल्यास तिचा फोटो आणि माहिती काही किलोमीटरच्या परिसरातील लोकांच्या मोबाईल फोनवर संदेशाद्वारे पाठवली जाईल. त्यामुळे हरवलेल्या व्यक्तीची माहिती तात्काळ नागरिकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा शोध लवकर लागण्यास मदत होईल.

गुन्हेगारांचा त्वरित मागोवा

तसेच कुख्यात गुन्हेगार आणि धोकादायक दहशतवाद्यांना पकडण्यासाठी तसेच नागरिकांना सतर्क करण्यासाठी त्यांच्या छायाचित्रांसह माहिती मोबाईल फोनवर संदेशाद्वारे पाठवली जाईल. ही प्रणाली पोलिस कोठडीतून पळून गेलेल्या किंवा तुरुंगातून फरार झालेल्या गुन्हेगारांना पकडण्यात मदत करेल. त्यांच्या छायाचित्रांची माहिती लोकांच्या मोबाईलवर तात्काळ पोहोचल्याने नागरिकांना त्या गुन्हेगारांविषयी माहिती मिळेल. त्यामुळे अशा गुन्हेगारांना लवकर पकडणे शक्य होईल आणि पोलिसांना मोठी मदत मिळेल. मात्र, हे फीचर्स नेमके कधी लागू केले जाणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक
#नवीनतम कथा
  1. कमी किंमत, मोठी स्टोरेज! Coolpad Cool 80 ची दमदार एंट्री
  2. चुंबकामुळे मिळणार थंडावा; बदलणार AC आणि फ्रिजचे भविष्य
  3. Will Cathcart यांची एक्झिट, WhatsApp ची कमान कुणाल शाह यांच्या हाती
  4. कुणाल शाह यांच्याकडे WhatsApp ची जबाबदारी? मोठी बातमी चर्चेत!
  5. मोबाईल अलर्टने होणार शोधमोहीम वेगवान; हरवलेल्यांचा माग काढणे सोपे
  6. OPPO Reno 15C वर 5,200 पर्यंत सूट; 7000mAh बॅटरीचा दमदार स्मार्टफोन स्वस्तात खरेदीची संधी
  7. 1000mAh बॅटरी आणि RGB लाइटिंगसह Lenovo Aurora GH15 गेमिंग हेडफोन लॉन्च; जाणून घ्या किंमत
  8. 48 तासांच्या बॅटरीसह UGREEN HiTune S6 Pro इयरफोन्स लॉन्च; Bluetooth 6.0 आणि Spatial Audio ची साथ
  9. Samsung Galaxy S26 Ultra वर तब्बल ₹25,000 सूट! Flipkart वरील जबरदस्त ऑफरची माहिती जाणून घ्या
  10. 5G स्मार्टफोनची मेगा टक्कर! Tecno Pova 8, Edge 70 Fusion आणि Vivo Y400 5G पैकी कोणता घ्यावा?
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »