Nothing Phone 3 मध्ये पहा कॅमेरा बद्दलचे अपडेट्स; 50MP Triple Camera System असणार

Nothing Phone 3 मध्ये 5,150mAh battery आणि 100W wired fast charging चा सपोर्ट असणार आहे.

Nothing Phone 3 मध्ये पहा कॅमेरा बद्दलचे अपडेट्स; 50MP Triple Camera System असणार

आगामी नथिंग फ्लॅगशिपमध्ये ग्लिफ इंटरफेसऐवजी नवीन ग्लिफ मॅट्रिक्स असेल

महत्वाचे मुद्दे
  • Nothing Phone 3 च्या कॅमेरा सेटअपमध्ये तीन 50-मेगापिक्सेल सेन्सर असतील
  • 1 जुलैला Nothing Phone 3 चा भारतासह ग्लोबल लॉन्च होणार आहे, भारतीय वेळेनु
  • Nothing Phone 3 हा फोन eSIM सपोर्टसह येण्याची शक्यता
जाहिरात

Nothing Phone 3 हा आगामी स्मार्टफोन 1 जुलै दिवशी लॉन्च साठी सज्ज झाला आहे. या फोनचे टीझर टप्प्या टप्प्याने जारी केले जात आहेत. त्यासोबतच काही अनधिकृत लीक्स देखील समोर आले आहेत. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8s Gen 4 processor चा समावेश आहे. तर Glyph Matrix interface आहे. फोनच्या फीचर्स बद्दल समोर आलेल्या नव्या लीक मध्ये आता फोनचे बरेच स्पेसिफिकेशन्स समोर येणार आहेत. या लीकमध्ये फोनचा कॅमेरा, डिस्प्ले आणि फोनची बॅटरी यांचाही समावेश आहे.Tipster Gadget Bits ने X वर जारी केलेल्या Nothing Phone 3 च्या स्पेसिफिकेशन्स नुसार, फोनमध्ये 6.7-inch 1.5k OLED LTPO डिस्प्ले आहे. हा फोन Nothing OS 3.5 based on Android 15 वर चालतो. हा NFC ला सपोर्ट करतो.

Nothing Phone 3 च्या कॅमेरा सेटअपमध्ये तीन 50-मेगापिक्सेल सेन्सर असतील असे वृत्त आहे. यात 50-मेगापिक्सेल 3x पेरिस्कोप सेन्सर आणि 50-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड सेन्सर देखील असेल. समोरही, सेल्फीसाठीचा फ्रंट कॅमेरा देखील 50-मेगापिक्सेल कॅमेरा असेल. Nothing Phone 3 मध्ये 100 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,150mAh बॅटरी असल्याचे लीक झाले आहे. हा स्मार्टफोन वायरलेस चार्जिंग आणि रिव्हर्स वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करेल असे म्हटले जात आहे. हा फोन eSIM सपोर्टसह येण्याची शक्यता आहे.

Nothing Phone 3 बद्दल च्या चर्चांमध्ये 12GB RAM आणि 256GB storage स्टॅडर्ड मध्ये तर हाय एंड मॉडेल मध्ये 16GB RAM आणि 512GB storage असण्याचा अंदाज आहे.

Nothing Phone 3 च्या लॉन्चचं लाईव्ह टेलिकास्ट कधी, कुठे पहाल?

Nothing Phone 3 हा फोन फ्लिपकार्ट वर भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. YouTube मोबाईल लॉन्चचा कार्यक्रम लाईव्ह्ह टेलिकास्ट केला जाणार आहे. 1 जुलैला 6pm BST म्हणजेच भारतीय वेळेनुसार, रात्री 10.30 वाजता लाईव्ह स्ट्रिम केला जाणार आहे. The new Snapdragon 8s Gen 4 फोनमध्ये असणार आहे याची पुष्टी फोन कंपनी कडून करण्यात आली आहे. यामध्ये 5 वर्षांची operating system updates आणि 7 वर्षांचा software support आहे सोबतच security patches on the device चा देखील समावेश असणार आहे.

भारतात Nothing Phone 3 ची किंमत सुमारे Rs. 90,000 असल्याचे वृत्त आहे. Nothing Phone 3 स्मार्टफोन बाजारात Samsung आणि Apple, Google Pixel 9a च्या फ्लॅगशिप फोनशी स्पर्धा करण्याची शक्यता आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. फोल्ड डिझाइनचा सॅमसंगचा नवा स्मार्टफोन भारतात दाखल; पहा फीचर्स
  2. Samsung Galaxy Z Fold 7 भारतात लॉन्च; इथे पहा किंमत, ऑफर्स आणि स्पेसिफिकेशन्स
  3. Galaxy Buds 3 Pro वर Amazon Prime Day सेलमध्ये मोठा डिस्काउंट जाहीर
  4. Amazon Prime Day 2025 मध्ये iQOO स्मार्टफोन्सवर जबरदस्त ऑफर्स जाहीर; पहा अपडेट्स
  5. 14 जुलै ला लॉन्च होणार्‍या Vivo X Fold 5 आणि X200 FE च्या किंमती इंटरनेट वर लीक
  6. आयफोनही आता येणार दमदार बॅटरीज सोबत; पहा iPhone 17 Pro Max बद्दलची अपडेट
  7. Honor X9c 5G भारतात 7 जुलै येतोय; 12 जुलै पासून विक्री होणार Amazon वर सुरू
  8. Amazon चा 72 तासांचा Prime Day सेल जाहीर; पहा स्मार्टफोन सह कोणत्या वस्तूंवर मिळणार सूट
  9. Nothing Headphone (1) भारतात लॉन्च; पहा प्रीमियम फीचर्स, किंमत इथे
  10. Nothing Phone (3) भारतात अखेर आलाच; किंमत ₹79,999 पासून सुरू
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »