Nothing Phone 3a Lite दोन रंग पर्यायांमध्ये लॉन्च होऊ शकतो जो काळा आणि पांढरा रंगांमध्ये असू शकतो.
हा स्मार्टफोन काळा आणि पांढरा अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध असल्याचे वृत्त आहे
Nothing कडून लवकरच Nothing Phone 3a Lite हा नवा स्मार्टफोन बाजारात लॉन्च केला जाणार आहे. भारतासोबतच हा ग्लोबल मार्केट मध्येही दाखल होण्यास सज्ज आहे. नुकताच हा Geekbench वर दिसला आहे. त्यामध्ये महत्त्वाची स्पेसिफिकेशन्स आणि नवी लीक्स समोर आली आहेत. सोबतच त्याची किंमत आणि लॉन्च टाईमलाईनची माहिती देण्यात आली आहे. लीक्सनुसार, फोनमध्ये रंगांचे दोन पर्याय आहेत आणि फोन सिंगल कॉन्फ्युगरेशन मध्ये येणार आहे.फ्रेंच आउटलेट Dealabs च्या एका अहवालानुसार, Nothing Phone 3a Lite नोव्हेंबरच्या सुरुवातीला युरोपमध्ये लाँच होऊ शकतो. या फोनची विक्री 4 नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. लाँच तारखेबद्दल Nothing कडून अद्याप कोणताही अधिकृत माहिती आलेली नाही.
Dealabs च्या रिपोर्टमध्ये फोनची फ्रान्समधील किंमत देखील समोर आली आहे, जी €249.99 असण्याची अपेक्षा आहे, भारतात ही किंमत अंदाजे 21,965 रुपये आहे. इतर युरोपीय देशांमध्ये किंमत वेगळी असू शकते जी €239.99 पासून सुरू होऊ शकते, जी सुमारे 21,087 रुपये आहे. या किंमती 8GB RAM आणि 128GB अंतर्गत स्टोरेजच्या बेस स्टोरेज व्हेरिएंटच्या असण्याची अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त, Nothing Phone 3a Lite दोन रंग पर्यायांमध्ये लॉन्च होऊ शकतो जो काळा आणि पांढरा रंगांमध्ये असू शकतो.
कॅमेरा सेटअप: फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असण्याचा अंदाज आहे ज्यात 50 MP मुख्य सेन्सर, 50 MP टेलिफोटो लेन्स आणि 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेराचा अंदाज आहे.
दरम्यान या वर्षाच्या सुरुवातीला,Nothing ने त्यांची Phone 3a series लाँच केली, ज्यामध्ये दोन मॉडेल्स होते - The Nothing Phone 3a Pro आणि Phone 3a, हे दोन्ही फोन्स 30 हजार रुपयांच्या श्रेणीतील होते. आता, कंपनी Nothing Phone 3a Lite च्या माध्यमातून आणखी एक परवडणारा फोन लाँच करण्याची अपेक्षा आहे.उद्योग क्षेत्रातील सूत्रांनी असेही सुचवले आहे की Nothing Phone 3a Lite मध्ये CMF Phone 2 Pro सारखेच मॉडेल असू शकतात, जरी त्याच्या डिझाइन आणि फीचर्स मध्ये फरक असू शकतो.
जाहिरात
जाहिरात
Cat Adventure Game Stray is Reportedly Coming to PS Plus Essential in November