Nothing Phone 3a Lite हा फोन Nothing च्या सिग्नेचर ग्लिफ इंटरफेसला नवीन ग्लिफ लाईट सिस्टमने बदलते जे पुन्हा डिझाइन केलेल्या स्वरूपात अलर्ट सूचना देते.
या स्मार्टफोनमध्ये पारदर्शक बॅक पॅनल आहे आणि तो पांढऱ्या आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे
Nothing कडून नवा मिड रेंज लाईनअप मधील Phone 3a Lite फोन लॉन्च होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतामध्ये हा फोन लवकरच लॉन्च होणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार, X,वर पोस्ट केलेल्या माहितीमध्ये हा फोन यूजर्सच्या अपेक्षेपेक्षा जास्त घेऊन येईल. ऑक्टोबरमध्ये जागतिक स्तरावर सादर करण्यात आलेला हा हँडसेट Nothing Phone 3a series चा भाग आहे आणि या फोनची ग्लोबल स्पेसिफिकेशन्स आणि डिझाइन फीचर्स लवकरच समोर येण्याचा अंदाज आहे.Nothing Phone 3a Lite चा भारतामधील लॉन्च,Nothing Phone 3a Lite च्या टीझरमध्ये, Nothing ने म्हटले आहे की, "Lite-ning नेहमीच काहीतरी अधिक सोबत असते," जे सूचित करते की भारतात लाँचिंग अतिरिक्त ऑफर्स किंवा अॅक्सेसरीज आणू शकते. पोस्टमध्ये फोन काळ्या आणि पांढऱ्या रंगांमध्ये दिसत आहे, जे भारतीय बाजारपेठेसाठी दोन्ही पर्यायांची पुष्टी करते. कंपनीने अद्याप लाँच तारीख जाहीर केलेली नसली तरी, Nothing च्या वेबसाइट आणि सोशल मीडिया चॅनेलवर Phone 3a Lite अजूनही "Coming Soon" दाखवते.
Nothing Phone 3a Lite मध्ये 6.77 इंचाचा फुल-एचडी+ फ्लेक्सिबल एमोलेड डिस्प्ले आहे ज्याचे रिझोल्यूशन 1,080 × 2,392 पिक्सेल आहे. हा 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो आणि 3000 निट्स पर्यंत पीक एचडीआर ब्राइटनेस देतो. हा फोन Nothing च्या सिग्नेचर ग्लिफ इंटरफेसला नवीन ग्लिफ लाईट सिस्टमने बदलते जे पुन्हा डिझाइन केलेल्या स्वरूपात अलर्ट सूचना देते.
Nothing Phone 3a Lite मध्ये MediaTek च्या Dimensity 7300 Pro चिपसेटचा वापर केला जातो. हा फोन Android 16 वर आधारित Nothing OS 3.5 वर चालतो. यात 8GB रॅम आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे, ज्यामध्ये मायक्रोएसडी कार्ड वापरून स्टोरेज 2TB पर्यंत वाढवण्याचा पर्याय आहे. कंपनीने Android च्या तीन प्रमुख व्हर्जेन अपडेट्स आणि 6 वर्षांच्या security maintenance च्या रिलीझचे आश्वासन दिले आहे.
Nothing Phone 3a Lite मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 50MP चा प्रायमरी सेन्सर, 8MP चा अल्ट्रावाइड लेन्स आणि तिसरा सेन्सर (ज्याची अद्याप फार माहिती नाही) आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी, यात 16MP फ्रंटफेसिंग कॅमेरा आहे. Nothing Phone 3a Lite मध्ये 5,000mAh बॅटरी आहे जी 33W वायर्ड फास्ट चार्जिंग, 5W रिव्हर्स वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.
जाहिरात
जाहिरात