2025 च्या वर्षअखेरीपर्यंत हा Nothing Phone 3a Lite भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च होण्याचा अंदाज आहे.
Photo Credit: Nothing
Nothing Phone 3a Lite वर्षअखेर भारतासह जागतिक बाजारपेठेत, विविध रंग आणि कॉन्फिगरेशनसह लाँच होऊ शकतो
Nothing Phone 3 आणि Nothing Phone 3 Pro नंतर आता या सीरीज मध्ये अजून एक नवा फोन समाविष्ट होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, Nothing Phone 3a Lite सध्या डेव्हलपमेंट मोड मध्ये आहे. हा फोन स्टॅन्डर्ड मॉडल पेक्षा किफायतीदार असणार आहे. अद्याप या फोनाबद्दलचे अपडेट्स समोर आलेले नाहीत पण अपेक्षा आहे की कंपनी या स्मार्टफोन लाईनअप मध्ये नवा स्मार्टफोन हा त्यांच्या Phone 3a च्या खाली लॉन्च केला जाईल. माहित देण्यात आल्यानुसार हा फोन Nothing Phone 3a Lite असण्याचा अंदाज आहे. सिंगल 8GB+128GB रॅम आणि स्टोरेज कॉन्फ्युगरेशन मध्ये हा फोन लॉन्च होऊ शकतो तर बाजारात हा फोन काळा आणि पांढरा अशा दोन रंगांमध्ये लॉन्च होण्याचा अंदाज आहे.
टिपस्टर च्या माहितीनुसार,XpertPic रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, Nothing Phone 3a Lite हा फोन लवकरच बाजारात येणार असून तो Carl Pei त्याला Nothing Phone 3 सीरीज मध्ये जोडणार आहे. अहवालातील माहितीनुसार हा फोन इतर बाजारपेठांमध्ये अतिरिक्त स्टोरेज प्रकार किंवा रंग पर्यायात येईल. Nothing Phone 3a Lite वर्षाच्या अखेरीस भारतासह जागतिक बाजारपेठेत लाँच होऊ शकतो.
Nothing Phone 3a Lite हँडसेटच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल अजूनही कोणतीही माहिती उपलब्ध नाही. कंपनीच्या लाइनअपमध्ये तो फोन 3a च्या खाली असल्याने, त्याचे स्पेसिफिकेशन्स स्टॅन्डर्ड फोनप्रमाणे किंवा किंचित कमी असू शकतात. तर किंमतीमध्ये हा फोन 20 हजारांच्या आसपास लॉन्च होण्याचा अंदाज आहे.
Nothing Phone 3a हा मार्च महिन्यात लॉन्च झाला होता. त्यामध्ये 6.7-इंचफ्लेक्सिबल AMOLED डिस्प्ले आहे. 1,080x2,392 पिक्सल्स रेजोल्यूशन, 120Hz अॅडप्टीव्ह रिफ्रेश रेट आणि 3,000 निट्स पीक ब्राइटनेस आहे. फोनमध्ये Snapdragon 7s Gen 3 चिपसेट आहे. ज्यात 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत ऑन बोर्ड स्टोरेज आहे. Android 15-बेस्ड NothingOS 3.1 वर चालतो. यामध्ये 3 वर्षांपर्यंत OS अपडेट्स आणि सहा वर्षांपर्यंत सिक्युरिटी पॅच मिळणार आहे.
Nothing Phone 3a फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे. तर 5,000mAh बॅटरी आहे जी 50W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
जाहिरात
जाहिरात