Photo Credit: Nothing
Nothing 4 मार्च दिवशी होणार्या इव्हेंट मध्ये दोन स्मार्टफोन बाजारात घेऊन येणार असल्याचा अंदाज आहे. ब्रिटीश स्मार्टफोन कंपनीने Nothing Phone 3a हा Phone 2a च्या पुढील फोन बाजारात आणल्याचं म्हटलं आहे. या वर्षाच्या अखेरीस फ्लॅगशिप फोन 3 सादर करण्यापूर्वी तीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची Nothing ची योजना आहे.
Android Headlines रिपोर्ट्सनुसार, Nothing Phone 3a आणि Phone 3a Pro हा 4 मार्चला लॉन्च होण्याचा अंदाज आहे. आधी लीक झालेल्या माहितीनुसार, “Plus” variant हा Phone 3a सोबत येऊ शकतो. त्यामुळे हा अंदाज देत आहे की याच्यामुळे प्रो मॉडेल रिप्लेस होऊ शकते.
Nothing Phone 3a हा दोन कॉन्फ्युगरेशन मध्ये उपलब्ध आहे. त्यामध्ये 8GB+128GB आणि 12GB+256GB हा व्हेरिएंट आहे. हा फोन काळा आणि पांढरा रंगांमध्ये उपलब्ध आहे. Phone 3a Pro
हा केवळ 12GB+256GB variant मध्ये आहे आणि तो केवळ ग्रे रंगामध्ये मिळणार आहे.
Nothing च्या आगामी लॉन्च इव्हेंट ची "Power in Perspective" अशी टॅगलाईन आहे. हा फोन Glyph interface चा आहे. त्यामध्ये दोन कॅमेरा रिंग्स आहेत. फोनच्या मागच्या बाजूला त्या उभ्या आहेत. तर फोनच्या स्पेसिफिकेशन्स अद्याप सांगण्यात आलेल्या नाहीत. कंपनी कडून अजून काही टीझर येण्याची अपेक्षा आहे.
पूर्वीचे रिपोर्ट्स पाहता Nothing Phone 3a मध्ये 6.8-inch full-HD+ AMOLED display आहे. 120Hz refresh rate आहे. फोनमध्ये Snapdragon 7s Gen 3 chipset आहे. ही चीपसेट 12GB of RAM, 256GB of onboard storage सोबत जोडलेली आहे. या फोनचा मॉडेल नंबर A059 आहे.
फोनमध्ये कॅमेरा पाहता, तो ट्रीपल रेअर कॅमेरा युनिटचा आहे. त्यामध्ये 50-megapixel main camera,50-megapixel telephoto sensor आहे. सोबत 8-megapixel ultra wide-angle sensor आहे. या फोनमध्ये 32-megapixel front camera हा सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी आहे.
Nothing Phone 3a मध्ये 5,000mAh battery आहे तर 45W charging support आहे. सोबतच फोनमध्ये NFC connectivity आहे.
जाहिरात
जाहिरात