अवघ्या 5.9mm जाडीचा Nubia Air, 5000mAh बॅटरीसह ग्लोबल मार्केट मध्ये दाखल; पहा किंमत, डिझाईन कसे?

Nubia Air ची जाडी फक्त 5.9mm आहे आणि वजन केवळ 172 ग्रॅम आहे. Nubia Air स्टायलिश आणि मिनिमलिस्टिक लुक देतो.

अवघ्या 5.9mm जाडीचा Nubia Air, 5000mAh बॅटरीसह ग्लोबल मार्केट मध्ये दाखल; पहा किंमत, डिझाईन कसे?

Photo Credit: Nubia

नुबिया एअर तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये दोन काळ्या रंगांचा समावेश आहे

महत्वाचे मुद्दे
  • Nubia Air चे वैशिष्ट्य म्हणजे फक्त 5.9mm इतके अल्ट्रा-पातळ डिझाईन
  • Nubia Air मध्ये Unisoc T8300 चिपसेट आहे जी 8GB RAM आणि 256GB onboard
  • Nubia Air मध्ये ट्रिपल-कॅमेरा सेटअप आहे ज्यात 50MP primary sensor आणि
जाहिरात

ZTE कडून त्यांचा अल्ट्रा स्लीम स्मार्टफोन Nubia Air हा बर्लिन मध्ये IFA 2025 मध्ये लॉन्च केला आहे. स्लिम पण दमदार अशा स्वरूपात सादर केलेला हा स्मार्टफोन थेट Galaxy S25 Edge सारख्या slim-profile phones असलेल्या मॉडेल्सशी स्पर्धा करतो. Nubia Air चे वैशिष्ट्य म्हणजे फक्त 5.9mm इतके अल्ट्रा-पातळ डिझाईन आणि तब्बल 5,000mAh क्षमतेची बॅटरी ही अल्ट्रा-स्लिम फोनमध्ये ही दुर्मीळ जोड मानली जाते.Nubia Air ची जाडी फक्त 5.9mm आहे आणि वजन केवळ 172 ग्रॅम आहे. Nubia Air स्टायलिश आणि मिनिमलिस्टिक लुक देतो. या स्लिम डिझाईनमध्ये 6.78-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले आहे, जो 2720×1224 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 440ppi पिक्सेल डेन्सिटीसह जिवंत व्हिज्युअल्स देतो. यात 120Hz रिफ्रेश रेट आणि तब्बल 4,500 निट्स पीक ब्राइटनेस सपोर्ट आहे, ज्यामुळे थेट उन्हातदेखील स्क्रीन सहज दिसतो.पूर्ण DCI-P3 कलर गॅमट कव्हरेज आणि गोरिल्ला ग्लास 7i संरक्षणासह, डिस्प्ले चमकदार आणि टिकाऊ आहे. हा फोन तीन प्रीमियम फिनिशमध्ये उपलब्ध आहे ज्यात टायटॅनियम ब्लॅक, स्ट्रीमर ब्लॅक आणि टायटॅनियम डेझर्ट चा समावेश आहे.

Nubia Air मध्ये Unisoc T8300 चिपसेट आहे. ज्यासोबत 8GB RAM आणि 256GB स्टोरेज असणार आहे. यामध्ये अतिरिक्त 12GB वर्च्युअल RAM ववाढवण्याची सुविधाही आहे. परिणामी यूजर्सना एकूण 20GB पर्यंत इफेक्टिव्ह मेमरी मिळते. यात दिलेला AI Performance Engine क्वचित वापरल्या जाणाऱ्या ॲप्स फ्रीझ करून रिसोर्सेसचे योग्य व्यवस्थापन करतो आणि बॅटरीचा कालावधी जवळपास 20 टक्क्यांनी वाढवतो.

Nubia Air मध्ये ट्रिपल-कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 50MP प्रायमरी सेन्सर असून त्यात EIS तंत्रज्ञान आहे, जे शेक-फ्री व्हिडिओसाठी मदत करते. कॅमेरा AI Super Night मोड, AI HDR आणि कंटेंट क्रिएटर्ससाठी खास VLOG मोडला सपोर्ट करतो. याशिवाय, यात Magic Editor आणि Magic Eraser सारखी एडिटिंग टूल्सदेखील इनबिल्ट आहेत. व्हिडिओ कॉल, सेल्फीसाठी, 20 मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे.
Nubia Air ची ग्लोबल मार्केट मधील किंमत $279 आहे, जी अंदाजे 24,600 रूपये इतकी आहे. सुरुवातीला हा स्मार्टफोन या महिन्यात युरोपमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे त्यानंतर 2025 मध्ये आशिया, लॅटिन अमेरिका, मध्य पूर्व आणि इतर प्रदेशांमध्ये उपलब्ध असेल.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Apple iPhone 17 Air च्या लॉन्चपूर्वी समोर आले अपडेट्स
  2. Apple iPhone 17 ‘Awe Dropping’ कार्यक्रम आज; महत्त्वाच्या घोषणांबाबत वाढली उत्सुकता
  3. iPhone 17 Pro मध्ये 8X झूम, प्रगत कूलिंग टेक्नॉलॉजी असणार? पहा अपडेट्स
  4. Apple Watch Series 11 आणि Ultra 3 मध्ये काय आहे खास? घ्या जाणून अपडेट्स
  5. Motorola Edge 60 Neo सोबत पॉवरफुल Moto G06 आणि G06 Power देखील आले बाजारात
  6. अवघ्या 5.9mm जाडीचा Nubia Air, 5000mAh बॅटरीसह ग्लोबल मार्केट मध्ये दाखल; पहा किंमत, डिझाईन कसे?
  7. iPhone 17 Pro च्या कूलिंग टेक्नोलॉजीमध्ये मिळणार मोठे अपडेट्स
  8. 15 सप्टेंबरला भारतात येणार Oppo F31 Series; डिझाईन, फीचर्स लीक
  9. आयफोन 17 सिरीज 9 सप्टेंबरला होणार लाँच; आयफोन 17 एअर ठरणार लक्ष्यवेधी, पहा अपडेट्स
  10. Oppo F31, F31 Pro, F31 Pro+ च्या डिझाईनची चर्चा; 7,000mAh बॅटरी च्या समावेशाचा अंदाज
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »