OnePlus या स्मार्टफोन कंपनीने मागील वर्षी डिसेंबर 2023 मध्ये आपला एक स्मार्टफोन OnePlus 12 लॉन्च केला होता. त्यानंतर आता या स्मार्टफोनचा पुढील भाग म्हणजेच OnePlus 13 केव्हा लॉन्च होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आणि अशा वेळी Tipster कडून या स्मार्टफोनच्या लॉन्च बाबत बरीचशी माहिती ऑनलाइन लीक झाल्याचे कळते. चला तर मग बघुयात, OnePlus चा आगामी स्मार्टफोन केव्हा लॉन्च होणार आहे आणि काय असणार आहेत या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये, किंमत आणि बरेच काही.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार OnePlus 13 हा स्मार्टफोन कंपनीकडून 2024 या वर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात लॉन्च केला जाऊ शकतो. मागील वर्षी लॉन्च झालेल्या OnePlus 12 च्या तुलनेत या स्मार्टफोनमध्ये थोडे बदल अपेक्षित आहेत, परंतु या स्मार्टफोनची किंमत समान असेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज या प्रकाराची किंमत 64,999 इतकी होती. पण अजूनपर्यंत OnePlus 13 चे रॅम आणि स्टोरेजच्या आधारे किती प्रकार पडू शकतात किंवा त्यांची किंमत काय असेल याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसून OnePlus 12 प्रमाणेच या स्मार्टफोनची किंमत ठेवण्यात येणार आहे.
Tipster कडून मिळालेल्या माहितीनुसार OnePlus 13 या स्मार्टफोनची बॅटरी ही 6000 mAh ची असून 100 वॅटच्या वायर आणि 50 वॅटच्या वायरलेस चार्जिंगचे समर्थन करते. बाजारात स्पर्धेमध्ये असलेल्या इतर स्मार्टफोनच्या 120 आणि 240 वॅटच्या चार्जिंगचे समर्थन करणाऱ्या स्मार्टफोनच्या तुलनेत जरी या स्मार्टफोनची क्षमता कमी असली तरी एक प्रतिस्पर्धी म्हणून तो बाजारात प्रवेश करणार आहे.
आता जाणून घेऊया OnePlus 13 च्या कॅमेरा बद्दल. OnePlus 12 प्रमाणेच या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा Sony LYT-808 हा कॅमेरा सेन्सर बसविण्यात आला आहे. त्यासोबतच या स्मार्टफोनमध्ये O916T haptic मोटर सुध्दा बसविण्यात आली आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूस LED फ्लॅश लाईट सोबत तीन कॅमेऱ्यांचा सेटअप बसविण्यात आला आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर आणि 50 मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलीफोटो लेंस सोबतच 3x ऑप्टिकल झूम देण्यात आला आहे.
OnePlus 13 या स्मार्टफोनचा डिस्प्ले हा किती इंचाचा असू शकतो हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी सुध्दा 2k रिजोल्यूशन सोबत 120 Hz चा रिफ्रेश रेट दर असलेला हा डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 4 chipset या प्रोसेसर द्वारे समर्थित असून या स्मार्टफोनला धूळ आणि पाणी प्रतिरोधक बनविण्यासाठी IP69 हे रेटिंग सुध्दा मिळाले आहे. अति सुरक्षा हेतू या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर सुद्धा बसविण्यात आला आहे. OnePlus 13 या स्मार्टफोनची समोर आलेली वैशिष्ट्ये ही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून समोर येत आहेत. हा स्मार्टफोन मागील वर्षी लॉन्च झालेल्या OnePlus 12 चा उत्तराधिकारी मनाला जाऊ शकतो, त्यामुळे हा स्मार्टफोनच्या तुलनेत थोडेफार प्रगत बदल अपेक्षित असतील.
जाहिरात
जाहिरात