Photo Credit: OnePlus
OnePlus 13 हा स्मार्टफोन ऑक्टोबर महिन्यात लॉन्च होण्याचा अंदाज आहे. कंपनीच्या एक्झिक्युटिव्ह कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार महिना अखेरीपर्यंत हा स्मार्टफोन लॉन्च होण्याचा अंदाज आहे. आधी हा फोन चीन मध्ये लॉन्च होणार आहे नंटर तो जगभर लॉन्च करण्याबद्दल माहिती दिली जाईल. लॉन्चबाबत टाईमलाईन जाहीर करण्यासोबत त्यांनी हा स्मार्टफोन performance च्या दृष्टीने मोठी झेप घेईल असा विश्वास व्यक्त केला आहे. या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 4 chipset असेल असा अंदाज आहे.
Weibo वरील पोस्ट नुसार, OnePlus China President Louis Lee यांनी दिलेल्या माहितीनुसार, OnePlus 13 smartphone हा या महिन्यात लॉन्च होणार आहे. तर ColorOS 15 वर चालणारा हा पहिला फोन आहे. Lee यांनी या फ्लॅगशीप स्मार्टफोन मध्ये परफॉर्मंस च्या दृष्टीने मोठी अपग्रेड असेल असं म्हटलं आहे. लेटेस्ट Snapdragon flagship chip या फोनमध्ये असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे Android फोन मध्ये यापूर्वी न पाहिलेली सहजता पहायला मिळणार आहे.
Snapdragon 8 Gen 4 chipset मध्ये neural processing unit दिसण्याचा अंदाज आहे. यामुळे त्याचा परफॉर्ममन्स अधिक वेगवान होण्याचा अंदाज आहे. हा परफॉर्ममन्स artificial intelligence (AI) शी निग्गडीत आणि अन्य कामाशी देखील निगडीत वर्कफ्लो मध्ये दिसणार आहे.
भारताला OnePlus 13 वर ColorOS 15 दिसण्याची शक्यता नसताना, Lee यांनी हायलाइट केले की ऑपरेटिंग सिस्टममध्ये new Tidal Engine आणि Aurora Engine, असेल, जे faster performance आणि smoother animation देण्यास मदत करणार आहे.
पूर्वीच्या रिपोर्ट्सनुसार, OnePlus 13 मध्ये 6.82-inch 2K 10-bit LTPO BOE X2 micro quad curved OLED display असू शकतो. तर 120Hz refresh rate असू शकतो. तसेच second generation of the BOE oriental screen असणार आहे.
जाहिरात
जाहिरात