Photo Credit: Qualcomm
OnePlus 13 या महिन्यामध्ये लॉन्च होणार असल्याची माहिती मिळाली आहे. हा फोन चीन मध्ये लॉन्च होईल. अद्याप तारखेबाबतची ठोस माहिती समोर आलेली नाही परंतू chipmaker Qualcomm या चीपमध्ये असणार असल्याची माहिती आहे. OnePlus 13 हा फोन new Snapdragon 8 Elite chip अर्थात Snapdragon 8 Gen 4 SoC सोबत असणार आहे. या चीपसेट मध्ये Oryon cores असण्याचा अंदाज आहे. नवी चीपसेट च्या Oryon cores ने परफॉर्मन्स आणि पॉवर देखील सुधारणार आहे अशी चर्चा आहे.
Snapdragon 8 Elite,हा येत्या 22 ऑक्टोबरला होणार्या Qualcomm's Snapdragon Summit मध्ये समोर येण्याची शक्यता आहे. यावर आगामी लॉन्च होणारे Xiaomi, Oppo, आणि iQOO चे स्मार्टफोन देखील असणार आहेत. Qualcomm कडून समोर आलेले व्हिडिओ पाहता prototype smartphone आहे ज्यात circular camera आहे. हा फोन आगामी OnePlus 13 सारखा दिसणारा आहे.
President of OnePlus China, Louis Lee यांनी एक नवा Snapdragon 8 teaser chip video शेअर केला आहे. त्यामुळे OnePlus 13 हा Qualcomm Snapdragon 8 Elite SoC वर चालणारा पहिला स्मार्टफोन असू शकतो. ही नवी चीपसेट Maui, Hawaii मध्ये होणार्या Snapdragon Summit मध्ये लॉन्च होणार आहे. दरम्यान यापुर्वी Xiaomi 15 मध्ये पहिल्यांदा Snapdragon 8 Elite chip असू शकते असा अंदाज होता. तर चीन मध्ये आगामी iQOO, Honor, Oppo फोनमध्ये देखील ही चिपसेट असण्याचा अंदाज आहे.
OnePlus 13 मध्ये 6.82-inch LTPO BOE X2 micro quad curved OLED display आहे. तर 2K resolution आणि 120Hz refresh rate आहे. यामध्ये रॅम 24 जीबी आणि ऑनबोर्ड स्टोरेज 1TB असण्याचा अंदाज आहे. यामध्ये ट्रीपल रेअर कॅमेरा सिस्टिम आहे. त्यामध्ये 50-megapixel LYT-808 main camera आहे. कॅमेरा सेटअप मध्ये 50-megapixel ultra-wide sensor आहे आणि 50-megapixel periscope telephoto shooter आहे ज्याच्यासोबत 3x optical zoom देखील आहे.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, OnePlus 13 मध्ये 6,000mAh battery असण्याचा अंदाज आहे. यापूर्वीच्या फोन मध्ये 5,400mAh battery असण्याचा अंदाज आहे. या फोनला 100W wired आणि 50W wireless charging सपोर्ट असण्याचा अंदाज आहे.
जाहिरात
जाहिरात