Photo Credit: OnePlus
OnePlus 13R हा OnePlus 12R च्या पुढील स्मार्टफोन आहे. हा फोन 2024 च्या सुरूवातीला आला होता. लवकरच तो लॉन्च होऊ शकतो आणि स्मार्टफोन बेंचमार्किंग वेबसाइटवर दिसला आहे. कंपनी कडून flagship OnePlus 13 चीन मध्ये आला आहे. ग्लोबल मार्केट मध्ये हा स्मार्टफोन येत्या काही महिन्यात लॉन्च होण्याचा अंदाज आहे. आता OnePlus 13R,मध्ये काय फीचर्स आहेत याचा अंदाज समोर आला आहे. जे कंपनीच्या हाय-एंड स्मार्टफोनसोबत येण्याची अपेक्षा आहे.
"OnePlus CPH2645" या मॉडेल नंबर सह हॅन्डसेट Geekbench वर लिस्ट झाला आहे. हा स्मार्टफोन OnePlus 13R,म्हणून येणार आहे. पण अद्याप कंपनीकडून त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. गेल्या काही वर्षांमध्ये, कंपनीने दोन स्मार्टफोन रिलीझ केले आहेत - एक फ्लॅगशिप मॉडेल आणि किंचित कमी प्रीमियम स्पेसिफिकेशन सह एक तुलनेत स्वस्त फोन असणार आहे.
Geekbench वर लिस्टिंग झाल्यानंतर स्मार्टफोन च्या मदरबोर्डचं नाव "pineapple" आहे. त्यामुळे OnePlus 13R हा Snapdragon 8 Gen 3 chipset सह येणार आहे. हा तोच प्रोसेसर आहे जो सध्या OnePlus 12 model असणार आहे.
Geekbench listing, नुसार OnePlus 13R मध्ये किमान 12GB of RAM आहे. OnePlus 13 हा Android 15, वर चालणारा आहे. बेंचमार्क रिजल्ट हा Android च्या त्याच व्हर्जन वर चालणारा फोन आहे.
OnePlus 13R चा single-core test चा स्कोर 2,238 points आणि multi-core test मध्ये 6,761 points आहे. हा स्कोअर OnePlus 12 च्या तुलनेत थोडा जास्त आहे.
चीनमध्ये, OnePlus 13 6.82-इंच डिस्प्लेसह येण्याचा अंदाज आहे, जो OnePlus 12 सारखाच आकार आहे. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि QHD+ रिझोल्यूशनसह आहे. स्क्रीन मध्ये 1,600nits आणि पीक ब्राइटनेस 4,500nits आहे. पण या मॉडेलमध्ये दोन महत्त्वाच्या अपडेट्स आहे. त्यामध्ये glove usability आणि high refresh rate फीचर्स असणार आहेत.
OnePlus 13 साठी कोणतीही किंमत लीक नाही, परंतु डिव्हाइसची किंमत 70,000 रुपयांपेक्षा कमी असण्याचा अंदाज आहे. OnePlus 12 भारतात 64,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. त्यामुळे OnePlus ने नवीन फोनची किंमत काही हजार रुपयांनी वाढवली जाऊ शकते. त्यामुळे या नव्या फोनची किंमत 70,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.
जाहिरात
जाहिरात