OnePlus 13 सीरीज व्यतिरिक्त, Amazon ने ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल दरम्यान त्यांच्या अनेक प्रोडक्ट्ससाठी सवलतीच्या किमती देखील जाहीर केल्या आहेत.
Amazon Sale 2025: सर्व वापरकर्त्यांसाठी सेल लाइव्ह होण्याच्या 24 तास आधी प्राइम सदस्यांना सेलमध्ये प्रवेश असेल
अमेझॉनचा यंदाच्या वर्षातील सर्वात मोठा फेस्टिवल सेल 23 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यामध्ये अनेक वस्तू, उपकरणांवर मोठी सूट जाहीर करण्यात येणार आहे. सेल सुरू होण्यापूर्वीच स्मार्टफोनवरील सूट जाहीर झाली आहे. यामध्ये अलीकडेच, अमेझॉनने OnePlus 13 आणि OnePlus 13s मॉडेल्सची सवलतीची किंमत जाहीर केली आहे. मग पहा OnePlus फ्लॅगशिपसाठी तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील?Amazon Great Indian Festival sale मध्ये OnePlus 13 आणि OnePlus 13s च्या किंमतींमध्ये मोठी सूटग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलच्या आधी Amazon हळूहळू स्मार्टफोन्सवर डील आणि डिस्काउंट जाहीर करत आहे. यामुळे ग्राहकांना खरेदी करताना मिळू शकणाऱ्या सवलती आणि ऑफर्सची कल्पना येते. अमेझॉन सेल दरम्यान, OnePlus 13 मोठ्या सवलतीच्या दरात उपलब्ध असेल. सुरुवातीला, हा फोन 12GB+256GB व्हेरिएंटसाठी 72,999 रुपयांना उपलब्ध होता. पण ग्राहकांना आता तो फक्त 57,999 रुपयांमध्ये मिळू शकतो. या किंमतीत ई-कॉमर्स सवलती आणि बँक ऑफर्स देखील समाविष्ट आहेत.
ग्राहकांना Amazon वरील एक्सचेंज डीलचा फायदा घेऊनही पैसे वाचवता येऊ शकतात. डिव्हाइस किती जुने आहे, त्याचा ब्रँड, किंमत आणि स्थिती यासारख्या गोष्टींवर आधारित, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म एक्सचेंज व्हॅल्यू सुचवते, जे नंतर तुम्ही खरेदी करत असलेल्या नवीन डिव्हाइसच्या किमतीतून कमी करून दिले जाते. एक्सचेंज व्हॅल्यूच्या मूल्यांकनाचा अंतिम निर्णय कंपनीकडे राहतो.
अमेझॉनच्या सेल दरम्यान, ग्राहक स्मार्टफोनवर प्लॅटफॉर्म-आधारित थेट सवलतींचा लाभ घेऊ शकतात. पण प्रभावी किंमत कमी करण्याचा हा एकमेव मार्ग नाही. अमेझॉनच्या सेल दरम्यान SBI बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड धारकांना व्यवहारांवर अतिरिक्त सवलत देखील देत आहे. अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२५ मध्ये अमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डद्वारे कॅशबॅक देखील देण्यात येईल अशी अपेक्षा आहे. नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील पर्याय आहे.
जाहिरात
जाहिरात