चीन मध्ये OnePlus 15 5G दाखल होतोय 27 ऑक्टोबरला पहा भारतात कधी येणार? पहा अपडेट्स

OnePlus च्या दाव्यानुसार, फोनचा डीस्प्ले OnePlus 13 च्या तुलनेत 10% कमी पॉवर घेते तर 30% अधिक टिकाऊपणा देते.

चीन मध्ये OnePlus 15 5G दाखल होतोय 27 ऑक्टोबरला पहा भारतात कधी येणार? पहा अपडेट्स

Photo Credit: Weibo/ OnePlus

OnePlus 15 मध्ये BOE च्या तिसऱ्या पिढीच्या स्क्रीनचा वापर

महत्वाचे मुद्दे
  • OnePlus 15 साठी चीनमध्ये प्री ऑर्डर्स देखील सुरू झाल्या आहेत
  • OnePlus 15 5G चीनमध्ये 27 ऑक्टोबरला लॉन्च होणार
  • फोन Absolute Black, Mist Purple, Sand Dune रंगांत उपलब्ध
जाहिरात

OnePlus च्या पुढील फ्लॅगशीप स्मार्टफोनची उत्सुकता आता शिगेला पोहचली असताना आता OnePlus 15 5G च्या लॉन्च डेटची घोषणा करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन चीन मध्ये 27 ऑक्टोबरला लॉन्च होत आहे. Weibo वर पोस्ट करत दिलेल्या माहितीनुसार, OnePlus 15 चा नवा फोन 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 7 च्या सुमारास चीनी वेळेनुसार आणि भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4.30 वाजता लॉन्च होणार आहे. फ्लॅगशीप स्मार्टफोन व्यतिरिक्त OnePlus Ace 6 देखील बाजारात आणणार आहे. दोन्ही हॅन्डसेट्स सध्या वनप्लसच्या अधिकृत स्टोअरफ्रंट वर दिसत आहेत. OnePlus 15 साठी चीनमध्ये प्री ऑर्डर्स देखील सुरू झाल्या आहेत.

OnePlus 15 5G चा डिस्प्ले, डिझाईन अपडेट्स

OnePlus 15 मध्ये 6.7-inch OLED display with 1.5K resolution आणि 165Hz refresh rate आहे. BOE's third-generation Oriental screen technology चा यामध्ये वापर करण्यात आला आहे. यामधील पॅनल वर सार्‍या बाजूंना ultra-thin 1.15mm bezels आहे. OnePlus च्या दाव्यानुसार, फोनचा डीस्प्ले OnePlus 13 च्या तुलनेत 10% कमी पॉवर घेते तर 30% अधिक टिकाऊपणा देते. HDR support आणि high-end visual standards ची देखील अपेक्षा आहे. ज्यामुळे एक चांगला अनुभव मिळतो.

OnePlus 15 5G मध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट आहे, जी LPDDR5X RAM आणि UFS 4.1 स्टोरेज येते.. मेमरी कॉन्फिगरेशन 12GB ते 16GB पर्यंत असण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये 1TB पर्यंत स्टोरेज पर्याय असतील. OnePlus गेमिंग परफॉर्मन्स वाढवण्यासाठी डिझाइन केलेले विंड ची गेम कर्नल 2.0 देखील सादर करू शकते.

The OnePlus 15 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप तीन 50 मेगापिक्सेल सेन्सर्स सोबत येतो. मुख्य शूटरमध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशनसह सोनीचा LYT-700 सेन्सर वापरला जाऊ शकतो, जो अल्ट्रा-वाइड आणि टेलिफोटो लेन्ससाठी दोन सॅमसंग ISOCELL JN5 सेन्सर्स सह येतो. यामध्ये 3.5x ऑप्टिकल झूम चा समावेश आहे. 7,300mAh बॅटरीचा त्यामध्ये समावेश असून 120W wired fast charging आणि 50W wireless charging सपोर्ट आहे. हा फोन Absolute Black, Mist Purple, आणि Original Sand Dune या तीन रंगांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

OnePlus 15 भारतात नोव्हेंबर 2025 मध्ये लाँच होण्याची चर्चा आहे, जो मागील मॉडेल्सपेक्षा थोडा लवकर येईल. नेमकी तारीख अद्याप निश्चित झालेली नसली तरी, अधिकृत तपशील लवकरच अपेक्षित आहेत.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. WhatsApp वर Quiz फीचर येणार? Channels साठी नव्या फीचरची चाचणी सुरू
  2. Samsung ने Galaxy S26 Edge रद्द केला, S26 लाइनअपमध्ये फक्त तीन व्हेरिएंट्स येणार असल्याची चर्चा
  3. Oppo Watch S लॉन्च; हेल्थ-फोकस्ड फीचर्स, किंमत पहा काय?
  4. Oppo Find X9 Series भारतात लवकरच येणार; पहा अपडेट्स
  5. Oppo Find X9 Pro आणि X9 मध्ये प्रीमियम Hasselblad कॅमेरे, दमदार चिपसेटचा समावेश
  6. OnePlus Ace 6 ची उत्सुकता शिगेला; समोर आली खास झलक
  7. OnePlus 15, Ace 6 एकाच दिवशी करणार एंट्री, कंपनीने लाँच डेट केली जाहीर
  8. चीन मध्ये OnePlus 15 5G दाखल होतोय 27 ऑक्टोबरला पहा भारतात कधी येणार? पहा अपडेट्स
  9. Instagram वर दिवाळी-थीम इफेक्ट्स आले; Instagram Stories आणि Reels ला पहा कसं लावायचं हे फिल्टर
  10. Apple MacBook Pro मध्ये स्मार्टफोनसारखा पंच-होल कॅमेरा आणि OLED डिस्प्ले येणार? चर्चांना उधाण
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »