OnePlus 15 आणि Ace 6 मध्ये बेस कॉन्फ्युगरेशन फीचर 12GB RAM आणि 256GB of internal storage असा आहे.
Photo Credit: OnePlus
OnePlus 15 मध्ये नवीन 'सँड ड्यून' शेड सादर होण्याची अपेक्षा आहे
OnePlus 15 आणि OnePlus Ace 6 च्या चीन मधील लॉन्च पूर्वी या आगामी फ्लॅगशीप फोन्सची किंमत लीक झाली आहे. Gizmochina, च्या रिपोर्ट्सनुसार हे तपशील Weibo वर शेअर केले गेले होते, ज्यामध्ये अनेक कॉन्फिगरेशनचे संकेत दिले गेले होते आणि ब्रँडच्या नवीन स्मार्टफोन सीरीजसाठी स्पर्धात्मक किंमत सुचवली गेली होती. OnePlus 15 series आज चीन मध्ये संध्याकाळी 7 वाजता(स्थानिक वेळेनुसार) लॉन्च होणार आहे. त्यासोबत OnePlus Ace 6 देखील असणार आहे. फोनची किंमत, स्पेसिफिकेशन आणि अन्य तपशील लवकरच जाहीर केले जातील. Tipster Paras Guglani यांच्या माहितीनुसार, OnePlus 15 चा ग्लोबल लॉन्च 12 नोव्हेंबर दिवशी असू शकतो.
पब्लिकेशनच्या माहितीनुसार, OnePlus 15 ची किंमत CNY 4,299 भारतीय किंमतीमध्ये अंदाजे 53,100 रूपये असण्याचा अंदाज आहे. ही किंमत 16GB + 256GB model ची आहे. 16GB + 512GB व्हर्जेनची किंमत CNY 4,899 म्हणजे अंदाजे भारतीय किंमतीनुसार, 60 हजार आहे. टॉप मॉडेल हे 16GB of RAM आणि 1TB of storage चे असून त्याची किंमत अंदाजे CNY 5,399 म्हणजे 66,700 रूपये आहे.
फ्लॅगशीप मॉडेल प्रमाणेच OnePlus Ace 6 देखील लोअर प्राईज पॉईंट मध्ये लॉन्च होण्याचा अंदाज आहे. या स्मार्टफोनची किंमत CNY 3,099 म्हणजे सुमारे 38,300 रूपये असण्याचा अंदाज आहे. ही किंमत 12GB + 512GB variant ची आहे. 16GB + 512GB हे मॉडेल CNY 3,399 म्हणजे भारतीय किंमतीमध्ये सुमारे 42,000 रूपये आहे.
OnePlus 15 आणि Ace 6 मध्ये बेस कॉन्फ्युगरेशन फीचर 12GB RAM आणि 256GB of internal storage असा आहे. सध्या त्याची किंमत गुलदस्त्यामध्ये आहे.
दरम्यान आता नव्याने लीक झालेल्या किंमती या पूर्वीच्या रिपोर्ट्सपेक्षा कमी आहेत. या आधी OnePlus 15 (16GB + 512GB) ची किंमत GBP 949 म्हणजे अंदाजे 1,11,000 रूपये सांगण्यात आली होती. दुसर्या एका रिपोर्ट्स मध्ये बेस व्हेरिएंट भारतीय किंमतीमध्ये 70 ते 75,000 रेंज मध्ये असल्याची माहिती आहे. आताच्या किंमतीचे अंदाज अचूक ठरल्यास OnePlus 15 अपेक्षांना कमी करू शकतो, ग्लोबल मार्केट मध्ये अधिक आक्रमक किमतीचा फ्लॅगशिप म्हणून स्थान देऊ शकतो.
जाहिरात
जाहिरात
Cat Adventure Game Stray is Reportedly Coming to PS Plus Essential in November