OnePlus 15 मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5G, Wi-Fi 7, NFC, Beidou, GPS, GLONASS, Galileo आणि QZSS चा सपोर्ट आहे.
Photo Credit: OnePlus
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात OnePlus 15 भारतात पदार्पण करेल अशी अपेक्षा आहे.
OnePlus कडून OnePlus 15 ची झलक समोर आणली आहे. चीन मध्ये झालेल्या October 2025 launch event मध्येच त्याची झलक समोर आली आहे. अनेक महिन्यांच्या लीक्स आणि अनुमानांनंतर, नवीन फोन त्याच्या पूर्वीच्या OnePlus 13 च्या तुलनेत डिझाइन, कामगिरी आणि बॅटरी तंत्रज्ञानात मोठे अपग्रेड आणतो. सर्वांचे लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे या फोनमध्ये असलेली 7,300mAh बॅटरी, जलद चार्जिंग स्पीड आणि नवीन Snapdragon 8 Elite Gen 5 chipset, जे त्याला आजपर्यंतच्या सर्वात शक्तिशाली Android फोनपैकी एक बनवते. मग पहा या फोनची महत्त्वाची फीचर्स किंमत ते भारतातील या फोनच्या लॉन्चचे अपडेट्स
OnePlus च्या फ्लॅगशीप फोनची चीन मधील किंमत दमदार आहे. या फोनचे बेस मॉडेल 12GB RAM आणि 256GB storage ची किंमत CNY 3,999 म्हणजे सुमारे 50 हजार रूपये आहे.16GB + 256GB, 12GB + 512GB, आणि 16GB + 512GB या व्हेरिएंट्सच्या किंमती अनुक्रमे CNY 4,299 (अंदाजे Rs 53,000), CNY 4,599 (अंदाजे Rs 57,000), आणि CNY 4,899 (अंदाजे Rs 61,000) आहे. 16GB + 1TB मॉडेल हे CNY 5,399 म्हणजे Rs 67,000 आहे. हा फोन Absolute Black, Misty Purple,आणि Sand Dune रंगांमध्ये उपलब्ध असेल. हा फोन 28 ऑक्टोबरपासून कंपनीच्या अधिकृत वेबसाइटद्वारे चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.
OnePlus ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर एक टीझर आधीच प्रदर्शित केला आहे ज्यामध्ये 29 ऑक्टोबर रोजी "काहीतरी खास" येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. कंपनीने अधिकृतपणे भारतात लाँच होईल की फक्त घोषणा असेल याची पुष्टी केलेली नसली तरी, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात फोन भारतात पदार्पण करेल अशी अपेक्षा आहे.OnePlus भारतात OnePlus 15 ला 60-70 हजार रुपयांच्या श्रेणीत ठेवू शकते.
जाहिरात
जाहिरात