OnePlus 15, Ace 6 एकाच दिवशी करणार एंट्री, कंपनीने लाँच डेट केली जाहीर

OnePlus 15 आणि OnePlus Ace 6 हे दोन्ही फोन Oppo e-Shop, JDMall आणि इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर प्री-रिझर्वेशनसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.

OnePlus 15, Ace 6 एकाच दिवशी करणार एंट्री, कंपनीने लाँच डेट केली जाहीर

Photo Credit: OnePlus

OnePlus Ace 6 मध्ये Snapdragon 8 Elite चिपसेट असेल

महत्वाचे मुद्दे
  • OnePlus Ace 6 आणि OnePlus 15 चीनमध्ये 27 ऑक्टोबर लॉन्च
  • दोन्ही फोन ऑनलाईन स्टोअरवर दिसतात आणि प्री-रिझर्व्हेशन खुले
  • OnePlus 15 Qualcomm Snapdragon 8 Elite Gen 5 सह येईल.
जाहिरात

OnePlus कडून आज 17 ऑक्टोबर दिवशी देण्यात आलेल्या माहितीनुसार, आगामी फ्लॅगशीप OnePlus 15 ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लॉन्च होणार आहे. फोनबाबत सुरू असलेल्या सार्‍या चर्चांना यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. वनप्लस कडून दहा दिवसांनी केवळ OnePlus 15 नाही तर OnePlus Ace 6 हा अजून एक हाय परफॉर्ममन्स फोन लॉन्च केला जाणार आहे. अद्याप फोन बद्दल सविस्तर फीचर्स, स्पेसिफिकेशन्स यांची माहिती उपलब्ध नसली तरीही हा हा फोन आता कंपनीच्या ऑनलाईन स्टोअरफ्रंट्स वर दिसत आणि प्री रिझर्व्हेशनसाठी खुला करण्यात आल्याने त्याची उत्सुकता वाढली आहे.

OnePlus Ace 6,OnePlus 15 च्या लॉन्चचे अपडेट्स

OnePlus Ace 6,OnePlus 15 या दोन्ही फोनचे लॉन्चिग चीन मध्ये 27 ऑक्टोबरला होणार आहे. कंपनीने Weibo,वर पोस्ट वर त्याची माहिती दिली आहे. माहितिनुसार चीन मध्ये हा लॉन्च सोहळा स्थानिकवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता (भारतीय वेळेनुसार 4.30) होईल. OnePlus Ace 6 बद्दल कंपनीने गुप्तता पाळली होती पण आता त्याचेही लॉन्च जाहीर झाले आहे. OnePlus 15 आणि OnePlus Ace 6 हे दोन्ही फोन Oppo e-Shop, JDMall आणि इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर प्री-रिझर्वेशनसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. 27 ऑक्टोबर रोजी लाँचनंतर त्यांची विक्री सुरू होण्याची अपेक्षा आहे.

OnePlus Ace 6 फीचर्स (अपेक्षित)

डिस्प्ले:

  • 1.5K BOE OLED स्क्रीन
  • 120Hz रिफ्रेश रेट

प्रोसेसर:

  • Qualcomm Snapdragon 8 Elite चिपसेट

मेमरी आणि स्टोरेज:

  • 16GB RAM (अपेक्षित)
  • 1TB इंटरनल स्टोरेज (अपेक्षित)

बॅटरी आणि चार्जिंग:

  • 7,800mAh बॅटरी
  • 120W फास्ट वायर्ड चार्जिंग सपोर्ट
  • OnePlus 15 फिचर्स (अपेक्षित)

डिस्प्ले:

  • 6.7-इंच OLED डिस्प्ले
  • 1.5K रिझोल्यूशन + 165Hz रिफ्रेश रेट
  • BOE ची 3rd-Gen Oriental Screen Technology
  • सर्व बाजूंना 1.15mm ultra-thin bezels

परफॉर्मन्स:

  • Qualcomm Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट
  • LPDDR5X RAM + UFS 4.1 स्टोरेज
  • मेमरी ऑप्शन्स: 12GB / 16GB RAM
  • स्टोरेज ऑप्शन्स: 512GB / 1TB
  • गेमिंगसाठी Wind ची Game Kernel 2.0 तंत्रज्ञान — smoother gameplay आणि thermal control साठी

बॅटरी आणि चार्जिंग:

  • 7,300mAh बॅटरी क्षमता
  • 120W वायर्ड फास्ट चार्जिंग
  • 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट

कॅमेरा सेटअप:

  • ट्रिपल 50MP कॅमेरा सिस्टम
  • Sony LYT-700 सेन्सर (OIS सह मुख्य लेन्स)
  • Samsung ISOCELL JN5 sensors – Ultra-wide + Telephoto
  • 3.5x ऑप्टिकल झूम सपोर्ट

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »