Photo Credit: Oneplus
OnePlus Ace 5V हा फोन OnePlus Ace 3V,चा उत्तराधिकारी म्हणून लॉन्च होण्याचा अंदाज आहे. हा फोन चीन मध्ये मार्च 2024 ला समोर आला होता. अद्याप कंपनीकडून त्याची माहिती देण्यात आलेली नाही. सध्या त्याची केवळ चर्चा सुरू आहे. tipster च्या माहितीनुसार, काही महत्त्वाचे स्पेसिफिकेशन लीक झालेले आहेत. OnePlus Ace 5 Pro आणि OnePlus Ace 5 Pro हे स्मार्टफोन Snapdragon 8 Elite SoCs सोबत चीन मध्ये मागील महिन्यात लॉन्च झाले आहेत.
Weibo वर tipster Digital Chat Station च्या माहितीनुसार, OnePlus Ace 5V आता आगामी स्मार्टफोन MediaTek Dimensity 9350 SoC सह येण्याचा अंदाज आहे. प्रतिक्षित MediaTek chipset ही "Dimensity 9300++," सोबत जोडलेली असेल. यामध्ये अपग्रेड्स असतील आणि सध्याच्या MediaTek Dimensity 9300 chipset पेक्षा ती अधिक सक्षम असेल असा अंदाज आहे.
tipster च्या माहितीनुसार, MediaTek's Dimensity 9350 किंवा Dimensity 9300++ SoC ही Qualcomm च्या Snapdragon 8s Elite chipset सोबत स्पर्धेत असू शकते.
चर्चेत असलेला OnePlus Ace 5V हा स्मार्टफोन 1.5K flat display आणि slim bezels सह असेल. 7,000mAh किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेची बॅटरी फोनमध्ये असेल. OnePlus Ace 3V मध्ये 5,500mAh battery होती त्याच्या तुलनेत या फोनमध्ये अपग्रेड आहे. OnePlus Ace 5V बाबतचे अधिक अपग्रेड्स हे येत्या काही दिवसांमध्ये समोर येणार आहेत.
OnePlus Ace 3V, मध्ये थोडे बदल करून भारतामध्ये तो फोन OnePlus Nord 4 म्हणून समोर आणला होता. त्यामुळे OnePlus आता Ace 5V model हा भारतासह चीन बाहेर ग्लोबल मार्केट मध्ये OnePlus Nord 5. म्हणून देखील लॉन्च करू शकतात. OnePlus Ace 3V चीनमध्ये मार्च 2024 मध्ये CNY 1,999 (अंदाजे रु. 23,500) किमतीत लॉन्च करण्यात आला होता, अशी शक्यता आहे की OnePlus Ace 5V हा त्या पुढील फोन देखील त्याच वेळी त्याच किंमत श्रेणीमध्ये येऊ शकेल.
ces_story_below_text
जाहिरात
जाहिरात