OnePlus Ace 6 हा पांढरा आणि गडद निळा (किंवा कदाचित काळा) रंगात देखील सादर केला जाईल.
Photo Credit: weibo / OnePlus
OnePlus Ace 6 Snapdragon 8 Elite, 16GB RAM, 1TB स्टोरेजसह
OnePlus कडून 27 ऑक्टोबरला flagship OnePlus 15 सोबत Ace सीरीज स्मार्टफोन OnePlus Ace 6 देखील लॉन्च केला जाणार आहे. Weibo या फोनचा टीझर जारी करत कंपनीने फोनच्या डिझाईन आणि रंगांची माहिती दिली आहे. OnePlus Ace 6 हा तीन रंगांमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. फोनच्या रेअर पॅनल वर “ACE” अशा ब्रॅन्डिगसह तो येणार आहे. या दोन्ही फोन्ससह, OnePlus त्यांच्या प्रीमियम स्मार्टफोन लाइनअपला बळकट करण्याचा आणि Samsung आणि Xiaomi सारख्या प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय ग्राहक चीनमध्ये या फोनच्या लाँचनंतर लवकरच OnePlus 15R चा रिब्रॅन्डेड फोन म्हणून Ace 6 येण्याची अपेक्षा करू शकतात.
जारी करण्यात आलेल्या टीझरमध्ये, OnePlus Ace 6 ला प्रीमियम सिल्व्हर फिनिशमध्ये दाखवण्यात आले आहे ज्यामध्ये मागील बाजूला "ACE" लोगो आहे. फोनचा कॅमेरा मॉड्यूल पुन्हा डिझाइन केला गेला आहे. चंदेरी व्यतिरिक्त, OnePlus Ace 6 हा पांढरा आणि गडद निळा (किंवा कदाचित काळा) रंगात देखील सादर केला जाईल. ज्यामध्ये चमकदार आणि सूक्ष्म पर्यायांचे मिश्रण आहे. चांदीचा फिनिश ठळकपणे उठून येत आहे, तर इतर शेड्स अधिक क्लासिक अपीलकडे झुकतात. अहवालांनुसार OnePlus Ace 6 मध्ये मेटल फ्रेम असेल. फ्रेमच्या वरच्या बाजूला तीन ओपनिंग्ज दिसतात, कदाचित मायक्रोफोन आणि IR ब्लास्टरसाठी त्या असू शकतात.
OnePlus Ace 6 हा Oppo च्या अधिकृत ऑनलाईन स्टोअर मध्ये प्री रिझर्व्हेशनसाठी खुला करण्यात आला आहे. तसेच JD.com अन्य ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहे. अवघ्या 1 CNY मध्ये फोन प्री बूक करता येत आहे. याच्या माध्यमातून सुमारे CNY 3,255 म्हणजे 40 हजार रूपयांच्या आसपासचे फायदे घेता येणार आहेत.
OnePlus Ace 6 मध्ये 1.5K BOE OLED screen, 120Hz refresh rate चा समावेश आहे. हा फोन Qualcomm च्या Snapdragon 8 Elite chipset वर चालेल अशी अपेक्षा आहे. OnePlus 13 मध्येही याच चीपसेटचा समावेश करण्यात आला होता. यात 16GB of RAM आणि 1TB of internal storage असू शकते.
दरम्यान OnePlus Ace 6 मध्ये 7,800mAh बॅटरी आणि 120W fast wired charging support असण्याचा अंदाज आहे
जाहिरात
जाहिरात