OnePlus Ace 6 मध्ये snapdragon 8 elite चीपसेट असणार आहे. ही चीपसेट सध्याच्या फ्लॅगशीप वनप्लस 13 मध्ये देखील आहे.
Photo Credit: Weibo/OnePlus
आगामी वनप्लस हँडसेट जागतिक स्तरावर वनप्लस १५आर म्हणून लाँच केला जाऊ शकतो.
वनप्लस पुढील आठवड्यामध्ये एक नवा शानदार 5G स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीमध्ये आहे. कंपनीकडून हॅन्डसेटची माहिती आणि काही स्पेसिफिकेशन्स यापूर्वीच जाहीर केले आहेत. या डिव्हाइसमध्ये 165Hz AMOLED डिस्प्ले असेल याची पुष्टी झाली आहे, जो सहज स्क्रोलिंग अनुभव देईल. बायोमेट्रिक्ससाठी, फोनमध्ये अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देखील असेल. याव्यतिरिक्त, या OnePlus डिव्हाइसमध्ये 7800mAh ची शक्तिशाली बॅटरी देखील असेल, ज्यामुळे तो मोठ्या बॅटरीचा स्मार्टफोन बनेल. मग पहा यामधील दमदार फीचर्स काय?
वनप्लस कडून या शानदार फोनमध्ये अल्ट्रा परफॉर्मन्स फ्लॅगशीप डिवाईस म्हणून संबोधले आहे. weibo या चीनी मायक्रो ब्लॉगिंग साईट वर जारी माहितीमध्ये काही स्पेसिफिकेशन्स दिली आहे. कंपनीच्या माहितीनुसार या डिवाईस मध्ये 165Hz पर्यंत वेरिएबल रिफ्रेश रेट सपोर्ट असणार आहे. यामुळे 60Hz, 90Hz, 120Hz, 144Hz आणि 165Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट असणार आहे. मात्र एक फ्लॅट AMOLED स्क्रीन असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला एक अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील बघायला मिळणार आहे.
वनप्लसच्या या डिव्हाईस मध्ये तुम्हाला मॅटेलिक फ्लेम बघायला मिळेल. तसेच फोनला IP66, IP68, IP69 आणि IP69K रेटिंग मिळाले असल्याने तो धूळ पाण्यापासून सुरक्षित असणार आहे. यासोबतच हॅन्डसेट मध्ये 7,800mAh बॅटरीचा समावेश असणार आहे. हा या सेगमेंट मधील सगळ्यात मोठ्या बॅटरीवाला फोन आहे. मोठी बॅटरी असण्यासोबतच त्यामध्ये 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट असणार आहे. त्यामध्ये वायरलेस चार्जिंग सपोर्ट बद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
वनप्लस कडून या फोनच्या रंगांचे पर्याय यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे हा फोन 3 रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. त्यात काळा, पांढरा आणि चंदेरी रंगाचा समावेश आहे. फोनचं वजन 213 ग्राम असणार आहे. लिस्टिंगवरून समोर आलेल्या माहितीवरून हे देखील स्पष्ट होते की, या फोनमध्ये snapdragon 8 elite चीपसेट असणार आहे. ही चीपसेट सध्याच्या फ्लॅगशीप वनप्लस 13 मध्ये देखील मिळणार आहे. या फोनची किंमत सुमारे 40,000 रूपये असण्याचा अंदाज आहे. OnePlus Ace 6, OnePlus 15 सोबत, सध्या Oppo e-Shop, JDMall आणि कंपनीच्या इतर ऑनलाइन स्टोअरफ्रंटवर प्री-बुकिंगसाठी उपलब्ध आहे. हा फोन 27 ऑक्टोबर दिवशी संध्याकाळी 4.30 वाजता लॉन्च होणार आहे.
जाहिरात
जाहिरात
Assassin's Creed Shadows Launches on Nintendo Switch 2 on December 2