OnePlus Ace 6 हा 30 ऑक्टोबरपासून Oppo e-Shop, JDMall आणि कंपनीच्या इतर ऑनलाइन स्टोअरफ्रंट्सद्वारे ग्राहकांना उपलब्ध असणार आहे.
Photo Credit: Weibo / OnePlus
OnePlus Ace 6 ला IP66, IP68, IP69 आणि IP69K रेटिंगसह पूर्ण धूळ व पाणी संरक्षण आहे
OnePlus Ace 6 सोमवारी चीन मध्ये लॉन्च झाला आहे. हा हँडसेट OnePlus Ace 5 चा उत्तराधिकारी म्हणून आला आहे आणि भारतासोबत जागतिक बाजारपेठेत OnePlus 15R म्हणून बाजारात येण्याची अपेक्षा आहे. हा नवीन स्मार्टफोन Snapdragon 8 Elite SoC द्वारे सपोर्ट असणारी आहे, जो गेल्या वर्षीच्या फ्लॅगशिप OnePlus 13 मध्ये देखील होता. OnePlus Ace 6 मध्ये ड्युअल-रीअर कॅमेरा युनिट आहे. यामध्ये 50-मेगापिक्सेल प्रायमरी शूटर आहे. यात मेटल फ्रेम आहे आणि त्याचे वजन अंदाजे 213 ग्रॅम आहे.
कॉन्फिगरेशन किंमत (CNY) अंदाजे किंमत (रू)
30 ऑक्टोबरपासून Oppo e-Shop, JDMall आणि कंपनीच्या इतर ऑनलाइन स्टोअरफ्रंट्सद्वारे ते Quick silver फ्लॅश व्हाइट आणि ब्लॅक रंगांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल.
OnePlus Ace 6 मध्ये ड्युअल-सिम (नॅनो + नॅनो) असेल तसेच हा Android 16 वर आधारित ColorOS 16 वर चालतो. यात 165Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 5,000 nits पीक ब्राइटनेससह 6.83-इंच 1.5K (1,272 x 2,800 पिक्सेल) फ्लॅट AMOLED स्क्रीन आहे. पॅनेलमध्ये बायोमेट्रिक सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले 3D फिंगरप्रिंट स्कॅनर आहे आणि डोळ्यांच्या संरक्षणाच्या फीचर्सचा समर्थन देतो. हा हँडसेट Snapdragon 8 Elite चिपसेटने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 16GB of LPDDR5X Ultra RAM आणि 512GB of UFS 4.1 onboard storage आहे. ग्राफिक्स-केंद्रित कामे हाताळण्यासाठी G2 gaming chip देखील आहे.
फोनमधील कॅमेरा पाहता, OnePlus Ace 6 मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन (OIS) सह 50 MP मुख्य कॅमेरा आणि 8 MP चा अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 16 MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे. OnePlus हँडसेटमध्ये मेटल फ्रेम आहे. धूळ आणि पाण्यापासून फोन सुरक्षित राहण्यासाठी IP66 + IP68 + IP69 + IP69K रेटिंग आहे. OnePlus Ace 6 मध्ये 7,800mAh बॅटरी आहे, जी त्याच्या सेगमेंटमधील सर्वात मोठी असल्याचा दावा केला जातो.
जाहिरात
जाहिरात