OnePlus च्या या आगामी स्मार्टफोनमध्ये 9,000mAh बॅटरी असू शकते जी या सेगमेंटमधील सर्वात मोठ्या बॅटरी क्षमतेचा फोन बनू शकतो.
Photo Credit: OnePlus
डिव्हाइसचे नाव अज्ञात, पण महत्त्वाची माहिती आधीच लीक झाली आहे.
OnePlus कडून लवकरच OnePlus Ace 6T लॉन्च केला जाणार आहे. चीनमध्ये येणार्या या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 5 चीपचा समावेश असणार आहे. पण समोर आलेल्या माहितीनुसार, येत्या काही महिन्यांत हा ब्रँड आणखी एक Snapdragon 8-series वर चालणारा T-series phone लाँच करू शकतो. डिव्हाइसचे नाव अद्याप अज्ञात असले तरी, या फोनबद्दलची महत्त्वाची माहिती आधीच लीक झाली आहे. कदाचित, तो चीनमध्ये OnePlus Ace 6 Turbo म्हणून पदार्पण करू शकेल.
टिपस्टर Digital Chat Station ने केलेल्या लीकनुसार, हा आगामी वनप्लस फोन, जो Ace series चा भाग असू शकतो, तो Snapdragon 8s Gen 4 द्वारे सपोर्टेड असेल. तो दावा करतो की हे डिव्हाइस इतर ब्रँडच्या Dimensity 8500 पॉवर्ड फोनला टक्कर देण्यासाठी डिझाइन केले आहे, जे चीनमध्ये Spring Festival पूर्वी लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.. या डिव्हाइसमध्ये 1.5K रिझोल्यूशनसह 6.78-इंचाचा फ्लॅट LTPS डिस्प्ले असण्याची चर्चा आहे. रिफ्रेश रेट अद्याप अस्पष्ट आहे परंतु तो 144 Hz किंवा 165 Hz असण्याची अपेक्षा आहे, दोन्ही सामान्यतः गेमिंग-केंद्रित हँडसेटमध्ये वापरले जातात.
प्रतिस्पर्धी फोन Redmi Turbo 5 आणि Realme Neo 8 SE असल्याचे दिसून येत आहे, कारण दोन्हीमध्ये Dimensity 8500 SoC असण्याची अपेक्षा आहे. टिपस्टरने सुचवलेल्या लाँच टाइमफ्रेमवरून असे दिसून येते की हे डिव्हाइस जानेवारीमध्ये किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या सहामाहीत अधिकृतपणे लाँच केले जाऊ शकतात.
इतर फीचर्स पाहता OnePlus फोनमध्ये 1.5K रिझोल्यूशनसह 6.78-इंचाचा OLED पॅनेल असल्याचे म्हटले जाते. हा हाय रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल, जो 144Hz किंवा 165Hz असू शकतो. बॅटरीची क्षमता '9K' पातळीच्या आसपास असण्याची शक्यता आहे, जी 9,000mAh बॅटरी दर्शवते. ही या सेगमेंटमध्ये दिसणाऱ्या सर्वात मोठ्या बॅटरींपैकी एक आहे.
OnePlus ने अलीकडेच पुष्टी केली आहे की Snapdragon 8 Gen 5 chip द्वारे सपोर्टेड OnePlus 15R, 17 डिसेंबर रोजी जागतिक स्तरावर लाँच होईल. वर नमूद केलेले स्पेक्स OnePlus Nord 6 वर दिसणाऱ्या गोष्टींशी चांगले जुळतात. ग्लोबल मार्केटमध्ये या डिव्हाइसचे नाव Nord 6 असे ठेवले जाईल की नाही याची पुष्टी करण्यासाठी पुढील अपडेट्सची वाट पहावी लागणार आहे.
जाहिरात
जाहिरात