Photo Credit: One Plus
OnePlus कडून भारतामध्ये OnePlus Community Sale जाहीर करण्यात आला आहे. हा सेल 6 डिसेंबरपासून 17 डिसेंबर पर्यंत चालणार आहे. वनप्लसच्या स्मार्टफोन, इअरबड्स, टॅबलेट्स आणि वेअरलेब्स डिव्हाईस वर किंमतीमध्ये कपात करण्यात आली आहे. जनरल डिस्काऊंट्स सह ग्राहकांना बॅंक बेस्ड पेमेंट ऑफर्स दिल्या जाणार आहेत. या ऑफर्स ICICI Bank, OneCard, RBL bank credit cards वर सूट मिळणार आहे. यामध्ये 12 महिन्यांसाठी no-cost EMI चा पर्याय दिला जाणार आहे. ही सूट निवडक प्रोडक्ट्स वर असणार आहे.
OnePlus 12 भारतात लॉन्च होताना 12GB of RAM,256GB storage व्हेरिएंट चा फोन Rs. 64,999 रुपयांना आला होता. यावर 6 हजार रूपयांची सूट मिळणार आहे. ICICI bank, OneCard, RBL credit card वर ग्राहकांना 7 हजार रूपयांची सूट मिळणार आहे. त्यामुळे आता किंमत 59,999 होणार आहे.
OnePlus 12R वर सेल मध्ये 6 हजार रूपये किंमत कमी होणार आहे तसेच बॅंक डिस्काऊंट 3 हजार रूपये मिळणार आहे. त्यामुळे आता फोनची किंमत 35,999 होणार आहे. OnePlus Nord 4 च्या काही व्हेरिएंट मध्ये 3000 रूपयांची सूट मिळणार आहे. ग्राहकांना इंस्टंट बॅंक डिस्काऊंट देखील 2 हजार रूपये मिळणार आहे.
OnePlus च्या Community Sale मध्ये OnePlus Nord CE 4 वर 2 हजारची डिस्काऊंट आणि इंस्टंट बॅंक डिस्काऊंट 1 हजार रूपयांचं डिस्काऊंट काही निवडक बॅंक कार्ड्स वर मिळणार आहे. हा फोन 22,999 रूपयांना मिळणार आहे.
OnePlus Open हा फोन 1,34,999 रूपयांना मिळणार आहे. OnePlus Pad Go हा स्मार्टफोन Rs. 27,999 ला मिळणार आहे. OnePlus Pad 2 आणि OnePlus Nord CE 4 Lite वर 2 हजार रूपयांची सूट मिळणार आहे.
OnePlus Nord CE 4 Lite वर 1000 रूपयांचे इंस्टंट बॅंक डिस्काऊंट मिळणार आहे सोबतच OnePlus Bullets Wireless Z2 मिळणार आहे.
OnePlus Watch 2 आणि OnePlus Watch 2R वर देखील 3 हजार रूपये सूट मिळणार आहे. ग्राहकांना इंस्टंट बॅंक डिस्काऊंट 3 हजार रूपये मिळणार आहे. OnePlus Watch 2 वर देखील 3 हजार रूपये सूट मिळणार आहे. OnePlus Watch 2R मध्ये 2 हजार रूपये सूट मिळणार आहे. OnePlus Watch 2 हे 20,999 रूपयांना मिळणार आहे.
OnePlus Buds Pro 3 वर 1 हजार रूपयांची सूट मिळणार आहे. तर इंस्टंट बॅंक डिस्काऊंट 1 हजार रूपये मिळणार आहे. त्यामुळे त्याची किंमत 11,999 होणार आहे. OnePlus Buds Pro 2 हा 7,999 ला मिळणार आहे.
वनप्लस वरील ही ऑफर अधिकृत वेबसाईट, Experience Stores, Amazon, Flipkart,आणि Myntra वर देखील उपलब्ध असणार आहे. ही ऑफर Reliance Digital, Croma, आणि Vijay Sales या ऑफलाईन रिटेलर्स वर देखील मिळणार आहे.
जाहिरात
जाहिरात