वनप्लसच्या या प्रो मॅक्स मॉडल मध्ये 6.7 इंचचा OLED डिस्प्ले मिळू शकतो. हा फोन 1.5K रिझोल्यूशनला सपोर्ट करेल.
Photo Credit: OnePlus
OnePlus Ace 6 (ચિત્રમાં) 16GB સુધી LPDDR5X અલ્ટ્રા રેમ, 512GB સુધી UFS 4.1 ઓનબોર્ડ સ્ટોરેજને સપોર્ટ કરે છે
OnePlus 15 आणि OnePlus Ace 6 हा नुकताच चीनी बाजारात पुन्हा लॉन्च करण्यात आला आहे. वनप्लस हे दोन्ही फोन्स लवकरच भारतासह ग्लोबल मार्केट मध्ये लॉन्च करणार आहे. यासोबतच कंपनीकडून एक Max फोन लॉन्च केला जाणार आहे. ज्यामध्ये 8000mAh बॅटरी असणार आहे. यासोबत फोनमध्ये 16GB रॅम आणि 1 TBपर्यंत स्टोरेज सपोर्ट असणार आहे. वनप्लस च्या फोनला सध्या स्पॉट करण्यात आला आहे. सोशल मीडीया प्लॅटफॉर्म Weibo वर वनप्लस च्या या फोनचे काही फीचर्स समोर आणले आहेत.वनप्लसचा हा नवा फोन OnePlus Ace 6 Pro Max नावाने लॉन्च करण्यात येऊ शकतो. चीनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Weibo वर या फोनची माहिती आहे. Smart Pikachu नावाने यूजरने केलेल्या पोस्ट मध्ये ही माहिती दिली आहे. या फोनमध्ये 12GB आणि 16GB LPDDR5x Ultra रॅम सोबत फोन येण्याचा अंदाज आहे. यासोबत 56GB, 512GB आणि 1TB पर्यंत इंटर्नल स्टोरेज सपोर्ट मिळू शकेल.
वनप्लसचा हा असा पहिला फोन आहे ज्यामध्ये अनरिलीज्ड Qualcomm Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर आहे. कंपनीच्या एका सीनियर अधिकार्याने त्याची माहिती दिली आहे. दरम्यान काही लीक्स मध्ये केलेल्या दाव्यानुसार हा फोन इलेक्ट्रिक पर्पल, फ्लॅश ब्लॅक आणि शॅडो ग्रीन रंगामध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.
OnePlus Ace 6 Pro Max या महिन्यात चीन मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. यासोबत OnePlus Ace 6 Turbo देखील समोर आणला जाऊ शकतो. वनप्लस च्या या प्रो मॅक्स मॉडल मध्ये 6.7 इंच चा OLED डिस्प्ले मिळू शकतो. हा फोन 1 .5K रिझोल्यूशनला सपोर्ट करेल. याशिवाय, फोनमध्ये 165 हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले असेल. यात 8000mAhची शक्तिशाली बॅटरी आणि 100 वॅट वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट असेल.
OnePlus Ace 6 Pro Max मधील कॅमेरा पाहता फोनच्या मागील बाजूला 50MP मुख्य कॅमेरा आणि मेन OIS प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. यासोबत फोनमध्ये 8MP अल्ट्रा वाईड कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये 32MP कॅमेरा मिळू शकतो. वनपप्लस आपल्या प्रिमियम फोनमध्ये अल्ट्रासोनिक इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरचा समावेश आहे. यासोबत फोनमध्ये ड्युअल स्टिरिओ स्पीकर NFC,सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळू शकतात. या सोबत Android 16 बेस्ड OxygenOS 16 वर काम करणार आहे.
जाहिरात
जाहिरात
Dyson Purifier Hot+Cool HP2 De-NOx, Purifier Hot+Cool HP1 Launched in India: Price, Features