OnePlus स्मार्टफोन सोबतच टॅबलेट वर सुध्दा मिळणार मासिक अपडेट

OnePlus ने 2 ऑगस्ट 2024 पासून मासिक अपडेट्स ची टप्प्याटप्प्याने सुरुवात केली आहे. जे 6 सप्टेंबर 2024 पर्यंत ठरलेल्या सर्व देशांपर्यंत हा OnePlus Update दरमहा पोहोचविण्याचे लक्ष OnePlus समोर आहे.

OnePlus स्मार्टफोन सोबतच टॅबलेट वर सुध्दा मिळणार मासिक अपडेट

Photo Credit: OnePlus

महत्वाचे मुद्दे
  • आता OnePlus स्मार्टफोन आणि टॅबलेटला मिळणार मासिक सॉफ्टवेअर अपडेट्स.
  • OnePlus 12, Pad 2 आणि Nord 4 ह्या स्मार्टफोन्सचा ही समावेश.
  • OnePlus Update भारत आणि इतर देशांमध्ये सुध्दा आणली जाणार आहेत.
जाहिरात
तुमच्या स्मार्टफोनवर सुध्दा अनेकदा सॉफ्टवेअर अपडेट आल्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत असतील, जे सामान्यपणे प्रत्येक स्मार्टफोन कंपनीकडून दर चार किंवा सहा महिन्यांनी दिले जाते. स्मार्टफोन अपडेट केल्यानंतर त्यात काही नवीन गोष्टी देखील आपल्याला बघायला मिळतात. पण सध्या OnePlus ह्या ब्रँडने असे अपडेट दर महिन्याला OnePlus स्मार्टफोनवर आणि टॅबलेटवर दिले जातील अशी माहिती दिली आहे. चला तर मग बघुयात काय आहे ह्या OnePlus Update मध्ये आणि कोणत्या स्मार्टफोनवर हा अपडेट लागू होईल.

काय आहे नवीन OnePlus Update पॉलिसी? 

OnePlus ने सॉफ्टवेअर अपडेटच्या U120P01 आणि U120P02 ह्या दोन आवृत्या नुकत्याच आपल्या मंचावर जाहीर केल्या आहेत. ही OnePlus Update ची नवीन मालिका असून  या दरमहा सॉफ्टवेअर अपडेट सोबत OTA अपडेटला बायपास करतील आणि लगेचच नवीन वैशिष्ट्ये आणि सुधार स्मार्टफोन्समध्ये आणतील. OnePlus ने 2 ऑगस्ट 2024 पासून मासिक अपडेट्स ची टप्प्याटप्प्याने सुरुवात केली आहे. जे सध्या जगातील काही मर्यादित देशांमध्ये म्हणजेच भारत, फिलीपिन्स, मलेशिया, व्हिएतनाम, थायलंड, सिंगापूर, कतार, कुवेत, UAE आणि सौदी अरेबिया सारख्या मध्य पूर्व देशांमध्ये उपलब्ध आहे. 6 सप्टेंबर 2024 पर्यंत ठरलेल्या सर्व देशांपर्यंत हा OnePlus Update दरमहा पोहोचविण्याचे लक्ष OnePlus समोर आहे. 

OnePlus च्या कोणत्या स्मार्टफोनला मिळणार दरमहा Update?

OnePlus चा नवीन OnePlus Update OxygenOS 13.1.0 आणि 13.00 सह OxygenOS 14.00 आणि त्यावरील चालत असलेल्या स्मार्टफोन सोबत सुसंगत असणार आहे. जाणून घेऊया हा अपडेट नक्की कोणत्या स्मार्टफोनवर लागू होणार आहे. 

OxygenOS 14.0.0 म्हणजेच OnePlus 12 सिरीज, OnePlus Open सिरीज, OnePlus 11 सिरीज, OnePlus 10 सिरीज आणि OnePlus 9 सिरीज ह्या सर्व सीरिजच्या स्मार्टफोन्सवर मासिक OnePlus Update येणार आहे. त्यानंतर स्मार्टफोन्स मध्ये OnePlus 8T, OnePlus Nord 4, OnePlus Nord 3, OnePlus Nord 2T, OnePlus Nord CE 4 आणि OnePlus Nord CE 3 ह्यांचादेखील समावेश आहे. सोबतच OnePlus Nord CE 3 Lite, OnePlus Nord CE 2 Lite, OnePlus Pad आणि OnePlus Pad Go हे सुद्धा मासिक अपडेट साठी पात्र आहेत.

OxygenOS 13.1.0 वर चालणारे फक्त दोनच स्मार्टफोन्स ह्या मासिक OnePlus Update साठी पात्र ठरले आहेत, ते म्हणजे OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro. तर OxygenOS 13.0.0 वर चालणाऱ्या OnePlus Nord 2, OnePlus Nord CE 2 आणि OnePlus Nord CE 5G ह्या तीन स्मार्टफोनवर सुध्दा दरमहा अपडेट येत राहणार आहे.

हा OnePlus Update नवीन असल्याने नमूद केलेल्या स्मार्टफोन्सच्या यादीतील स्मार्टफोन तुमच्या वापरात आहे, पण तुम्हाला ह्या अपडेटचे नोटीफिकेशन किंवा सूचना मिळत नाही. त्यावर कोणतीही चिंता न करता तुम्ही अपडेट्ससाठी थोडी वाट पाहावी.
Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. TENAA लिस्टिंगमध्ये समोर आले Moto G36 चे डिझाईन व स्पेसिफिकेशन्स
  2. Poco F7 5G ची किंमत फ्लिपकार्ट बिग बिलियन डेजमध्ये घसरली; पहा आता किंमत काय
  3. ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2025 मध्ये इको डिव्हाइस वर मिळणार मोठी सूट
  4. Amazon Great Indian Festival Sale 2025 मध्ये सोनी, सॅमसंग, TCL स्मार्ट टीव्हीवर आकर्षक डील्स जाहीर
  5. ॲपलकडून iOS 26 अपडेटसह iPadOS 26 व macOS Tahoe लॉन्च; पहा पात्र डिव्हाईसची यादी
  6. : Oppo F31 Series मध्ये Pro+, Pro आणि F31 5G चा समावेश; पहा काय आहेत फीचर्स
  7. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये Nothing Phone 3 अवघ्या 34,999 रूपयांत विकत घेण्याची संधी
  8. Realme P3 Lite 5G भारतात लॉन्च; पहा किंमत, स्पेसिफिकेशन्स काय
  9. iQOO 15 मध्ये 2K Samsung AMOLED डिस्प्ले; समोर आली माहिती
  10. Realme चा नवा P-Series स्मार्टफोन P3 Lite 5G आला दमदार फीचर्स आणि किफायतशीर किंमतीमध्ये
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »