ओप्पो कडून अद्याप Oppo A6 Pro 5G ची किंमत किंवा उपलब्धता याची माहिती देण्यात आलेली नाही. या फोनचा ग्लोबल व्हेरिएंट आता भारतामध्येही लॉन्च होण्याचा अंदाज आहे.
Photo Credit: Oppo
ओप्पो ए६ ५जी तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे
Oppo A6 Pro नंतर चीन मध्ये ओप्पो कंपनीने Oppo A6 Pro 5G हा नवीन स्मार्टफोन समोर आणला आहे. या दोन्ही स्मार्टफोन मध्ये काही स्पेसिकेशन मध्ये बदल करण्यात आले आहे. या दोघांमधील प्रमुख फरक म्हणजे त्यांची कनेक्टीव्हिटी आणि प्रोसेसर. Oppo A6 Pro हा स्मार्टफोन MediaTek Helio G100वर चालणार आहे. तर Oppo A6 Pro 5G हा MediaTek Dimensity 6300 Mobile Platform वर चालणार आहे.Oppo A6 Pro 5G ची किंमत आणि उपलब्धता,ओप्पो कडून अद्याप Oppo A6 Pro 5G ची किंमत किंवा उपलब्धता याची माहिती देण्यात आलेली नाही. या फोनचा ग्लोबल व्हेरिएंट आता भारतामध्येही लॉन्च होण्याचा अंदाज आहे. Oppo A6 Pro 5G हा मिड रेंज स्मार्टफोन आहे. हा फोन चार रंगांमध्ये उपलब्ध आहे ज्यात Titanium, Stellar Blue, Rosewood Red, आणि Coral Pink चा समावेश आहे.
Oppo A6 Pro 5G चा आकार हा 158.20x75.02x8.00mm आहे तर वजनाला हा फोन 185 ग्रामचा आहे. या फोन मध्ये तीन स्टोरेज कॉन्फ्युगरेशन मिळणार आहेत ज्यात 6GB RAM सोबत 128GB ROM, 8GB RAM सोबत 256GB ROM, आणि 12GB RAM सोबत 256GB ROMचा पर्याय आहे. हे LPDDR4X रॅम आणि UFS 2.2 ROM वापरते, फोन स्टोरेज कार्ड आणि USB OTG कार्यक्षमतेद्वारे बाह्य स्टोरेजसाठी सपोर्टही करते.
फोटोग्राफीसाठी, Oppo A6 Pro 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा आहे. ज्यामध्ये f/1.8 अपर्चरसह 50-मेगापिक्सेलचा वाइड-अँगल मुख्य कॅमेरा, 76-डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू (FOV), 5P लेन्स आणि ऑटोफोकस सपोर्ट आहे. तसेच f/2.4 अपर्चरसह 2-मेगापिक्सेल मोनोक्रोम कॅमेरा, 89-डिग्री FOV आणि 3P लेन्स आहे. फ्रंट कॅमेरा f/2.4 अपर्चरसह 16-मेगापिक्सेलचा सेन्सर, 85-डिग्री FOV आणि 4P लेन्स आहे. रियर कॅमेरा फोटो, व्हिडिओ, पोर्ट्रेट, नाईट, पॅनोरामा, स्लो-मोशन, ड्युअल-व्ह्यू व्हिडिओ, टाइम-लॅप्स, स्टिकर, हाय-रिझोल्यूशन, गुगल लेन्स, अंडरवॉटर, प्रो आणि डॉक्युमेंट स्कॅनर यासह अनेक शूटिंग मोडना सपोर्ट करतो. व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये 1080p आणि 720p 60fps वर किंवा 30fps वर फ्रंट आणि रियर कॅमेऱ्यांचा समावेश आहे, रियर कॅमेरा 720p वर 120fps स्लो-मोशन, 1080p वर 30fps टाइम-लॅप्स, 10x पर्यंत डिजिटल झूम आणि अंडरवॉटर व्हिडिओ रेकॉर्डिंगला देखील सपोर्ट करतो.
जाहिरात
जाहिरात