आगामी Oppo A6x ज्यांना मोठी बॅटरी आवडते आणि कमी किमतीत नवीन डिव्हाइस शोधत आहेत त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो.
Photo Credit: Oppo
SIRIM लिस्टिंगनुसार Oppo A6x लवकरच आशियाई बाजारात येऊ शकतो
Oppo ने आपल्या ए सीरीज मध्ये नवी मॉडल्स आणण्याची तयारी सुरू केली आहे. ज्यामध्ये Oppo A6x स्मार्टफोन येण्याचा अंदाज आहे. यची पहिली झलक लीक मध्ये समोर आली आहे. ज्यामध्ये अशी आशा आहे की कंपनी आगामी डिव्हाईस मध्ये आधीच्या मॉडल Oppo A5x च्या तुलनेत बॅटरी आणि डिझाईन दोन्ही मध्ये मोठे अपग़्रेड्स देऊ शकतात. टिपस्टर अभिषेक यादव यांच्या माहितीनुसार, सोशल मीडिया साईट X वर त्याची माहिती देण्यात आली आहे. SIRIM लिस्टिंगवरून असे दिसून येते की Oppo A6x लवकरच आशियाई बाजारपेठेत लाँच होऊ शकतो.लीक मध्ये टिपस्टर ने प्रमोशनल इमेज मधून फोनची पूर्ण रिअर डिझाईन आणि प्रमुख फीचर्सची माहिती दिली आहे. सगळ्यात महत्त्वाचा बदल हा या फोनच्या बॅटरी मधून करण्यात आला आहे. आगामी Oppo A6x मध्ये 6,500mAh बॅटरी दिली जाऊ शकते. जी A5x च्या 6,000mAh बॅटरीपेक्षा मोठी आहे. पोस्टरमध्ये त्याचे वर्णन "त्याच्या सेगमेंटमधील सर्वात मोठा बॅटरी फोन" असे केले आहे. चार्जिंग स्पीड 45 वॅटवर राहण्याची अपेक्षा असली तरी, ब्रँड कदाचित मोठ्या बॅटरी असलेल्या बजेट यूजर्सना लक्ष्य करत आहे.
Oppo A6x हा मागील मॉडेल Oppo A5x पेक्षा वेगळा दिसू शकतो. यामध्ये नवीन वर्टिकल पिल शेप कॅमेरा मॉड्युल आहे. ज्यामध्ये सिंगल रियर कॅमेरा आणि LED फ्लॅश आहे. हा फोन निळा आणि काळा रंगामध्ये दाखवण्यात आला आहे. Oppo A5x मध्ये 6.67 इंचाचा HD+ LCD डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि ब्राइटनेस 1000 निट्स पर्यंत आहे. फोन MIL-STD-810H आणि IP65 रेटिंगसह देखील येतो.
कामगिरीसाठी, Oppo A5x मध्ये MediaTek Dimensity 6300 चिपसेट आणि Mali-G57 MC2 GPU आहे. कॅमेरा सेटअपमध्ये सिंगल 32MP रियर कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा आहे. त्याची सुरुवातीची किंमत 13,999 रूपये होती. त्यामुळे, Oppo A6x ची किंमत देखील 15,000 रूपयांच्या आत असण्याची अपेक्षा आहे. आगामी Oppo A6x ज्यांना मोठी बॅटरी आवडते आणि कमी किमतीत नवीन डिव्हाइस शोधत आहेत त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो. भारतीय बाजारपेठेत Realme C75 5G, Redmi 14C आणि Lava Blaze Amoled 2 सारख्या परवडणाऱ्या फोनशी स्पर्धा करण्याची शक्यता आहे. पण खरी स्पर्धा किती आहे हे अधिक माहिती उपलब्ध झाल्यानंतरच समजणार
जाहिरात
जाहिरात