Photo Credit: Oppo
Oppo आणि OnePlus स्मार्टफोन मध्ये आता ColorOS 15 ही नवी ऑपरेटिंग सिस्टिम समोर आली आहे. गुरूवार, 17 ऑक्टोबर दिवशी त्याची माहिती देण्यात आली आहे. ही नवी ऑपरेटिंग सिस्टिम (AI)-powered features सह आहे. यामध्ये O+ interconnection app च्या मदतीने आता युजर्स फाईल्स ट्रान्सफर करू शकणार, ज्यात iPhone आणि Oppo मध्ये फोटोज, व्हिडीओज आणि डॉक्युमेंटस यांची देवाण-घेवाण होऊ शकते.
Oppo, च्या माहितीनुसार, ColorOS 15 हे रिफ्रेश युजर इंटरफेस घेऊन येऊ शकणार आहेत ज्यात नवे डायनॅमिक इफेक्ट्स असणार आहेत.
Circle to Search असणार आहे. यामध्ये स्क्रीन वर युजर्स इमेज वर टॅप करून किंवा सर्कल करुन त्याच्याबद्दल गूगल वर माहिती सर्च करू शकेल.
AI Ultra HD Pixels मुळे इमेज झीम इन, झूम आऊट करून HD quality राखू शकतो. क्वॅलिटी बिघडू न देता फोटो क्रॉप करण्याची देखील मुभा मिळणार आहे.
AI De-glare फीचर मुळे काचेच्या माध्यमातून फोटो कॅप्चर करताना फोटोत टिपलेले प्रतिबिंब काढता येणार आहे.
AI Voice Summary फीचर मुळे ऑडिओ, व्हिडिओ किंवा कॉल मधील माहितीचा लहानसा ट्रान्सस्क्राईब युजर्सना मिळणार आहे.
Split screen या फीचर मुळे युजर्सना दोन अॅप्स एकावेळी वापरता येतील. जे बाजूबाजूला किंवा वरखाली पाहता येणार आहेत.
Color 15 update हा Oppo Find N3, Oppo Find N3 Flip, OnePlus 12, OnePlus Tablet Pro, Oppo Find X7, आणि Oppo Find X7 Ultra मध्ये नोव्हेंबर महिन्यात उपलब्ध होत आहे. तर OnePlus 11, Oppo Reno 12 Pro, Oppo Find X6 series,Oppo Pad 2 आणि Oppo Find N2 मध्ये डिसेंबर महिन्यात उपलब्ध होणार आहे. नव्या वर्षामध्ये येणार्या मॉडेल्स मध्येही ही ऑपरेटिंग सिस्टिम वापरली जाणार आहे. जानेवारी 2025 मध्ये Oppo Find N2 Flip, Oppo Find X5, Oppo Find X5 Pro, Oppo Reno 10 5G, Oppo Reno 10 Pro 5G, Oppo Reno 10 Pro Star Edition 5G, OnePlus 10 Pro, OnePlus Ace 2V, OnePlus Ace Pro, या फोन मध्येही ही ऑपरेटिंग सिस्टिम दिसेल. फेब्रुवारी 2025 मध्ये Oppo Find X5 Pro Dimensity Edition, Oppo Reno 9 Pro+ 5G, Oppo Reno 9 Pro 5G, Oppo K12 Plus, Oppo K12 5G, OnePlus Ace, OnePlus Ace Racing Edition 5G या फोनमध्ये Color 15 असणार आहे.