OPPO Enco X3s TWS मध्ये 55 dB active noise cancellation (ANC) आहे
 
                Photo Credit: Oppo
Enco X3s TWS मध्ये 55 dB नॉईज कॅन्सलेशन सिस्टम
OPPO कडून Enco X3s TWS earbuds जगभर लॉन्च करण्यात आले आहेत. त्यासोबतच flagship Find X9 series देखील मंगळवारी (28 ऑक्टोबर) दिवशी लॉन्च झाली आहे. नवे इअरफोन्स हे ड्युअल ड्रायव्हर्स सोबत लॉन्च झाले असून ते IP55-rated असल्याने धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहेत. OPPO Enco X3s TWS चे अजून एक फीचर म्हणजे त्यामध्ये 55 dB active noise cancellation (ANC) आहे. हे इअरबड्स एकत्र 45 तासापर्यंत चार्जिंग केस सह प्लेटाईम देतात.OPPO Enco X3s ची किंमत SGD 189 अंदाजे 12,900 रूपये आहे. TWS earbuds हे खरेदीसाठी विशिष्ट भागात OPPO e-store वर उपलब्ध आहेत. दरम्यान हे इअरबड्स केवळ Nebula Silver या एकमेव रंगाच्या पर्यायामध्ये उपलब्ध आहेत.
OPPO Enco X3s मध्ये ड्युअल डायनॅमिक ड्रायव्हर्स आहेत. त्यामध्ये 11mm आणि युनिट्सचा समावेश आहे. हे इअरबड्स Dynaudio सोबत ट्यून केलेले आहेत. त्यामध्ये चार साऊंड प्रोफाईल्सचा समावेश आहे. authentic live mode, Pure Vocals, Ultimate Sound आणि Thundering Bass मध्ये तो मिळणार आहे.
Enco X3s TWS मध्ये तीन माईक अॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन सिस्टिम आहे. ज्याच्या द्वारा 55dB of noise reduction levels आहेत. OPPO कडून "Real-time Dynamic ANC" चा देखील समावेश करण्यात आला आहे. ज्याच्याद्वारा सार्वजनिक वाहतूक आणि गर्दीच्या कार्यालयांसारख्या बदलत्या वातावरणाशी त्वरित जुळवून घेता येऊ शकते. Enco X3s मध्ये अॅडॉप्टिव्ह मोड देखील आहे, जिथे इअरबड्स आपोआप नॉइज कॅन्सलेशन आणि ट्रान्सपरंसी लेव्हल अॅडजस्ट करते. टीडब्ल्यूएस इयरफोन्स वाऱ्याच्या परिस्थितीतही कॉल स्पष्टता सुनिश्चित करण्यासाठी एआय वर चालणार्या नॉइज सप्रेशन देतात.
OPPO Enco X3s मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Bluetooth 5.4 आहे. हे LHDC 5.0, AAC आणि SBC कोडेक्सद्वारे हाय-रिझोल्यूशन वायरलेस ऑडिओला सपोर्ट करतात. इयरफोन्समध्ये एक खास गेम मोड देखील आहे जो गेमिंग दरम्यान लेटन्सी कमी करतो. Enco X3s OPPO स्मार्टफोन्ससोबत जोडल्यास AI ट्रान्सलेटला देखील सपोर्ट मिळतो.ज्यामुळे 20+ भाषांमध्ये रिअल-टाइम आणि फेस-टू-फेस भाषांतर शक्य होते.
इअरबड्स सुमारे 50 मिनिटांत पूर्णपणे चार्ज होतात असा दावा केला जातो, तर चार्जिंग केस पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 80 मिनिटे लागतात. Enco X3s buds हे ANC off किंवा 6 तासांपर्यंत संगीत प्लेटाइम देतात. प्रत्येकी इअरबड्सचे वजन सुमारे4.73 ग्रॅम आहे. चार्जिंग केससह, TWS चे वजन सुमारे 49.02 ग्रॅम आहे.
जाहिरात
जाहिरात
 OpenAI Upgrades Sora App With Character Cameos, Video Stitching and Leaderboard
                            
                            
                                OpenAI Upgrades Sora App With Character Cameos, Video Stitching and Leaderboard
                            
                        
                     Samsung's AI-Powered Priority Notifications Spotted in New One UI 8.5 Leak
                            
                            
                                Samsung's AI-Powered Priority Notifications Spotted in New One UI 8.5 Leak
                            
                        
                     iQOO 15 Colour Options Confirmed Ahead of November 26 India Launch: Here’s What We Know So Far
                            
                            
                                iQOO 15 Colour Options Confirmed Ahead of November 26 India Launch: Here’s What We Know So Far
                            
                        
                     Vivo X300 to Be Available in India-Exclusive Red Colourway, Tipster Claims
                            
                            
                                Vivo X300 to Be Available in India-Exclusive Red Colourway, Tipster Claims