: Oppo F31 Series मध्ये Pro+, Pro आणि F31 5G चा समावेश; पहा काय आहेत फीचर्स

Oppo F31 Series मध्ये एआय व्हॉइसस्क्राइब, एआय कॉल असिस्टंट, एआय असिस्टंट आणि एआय समरी सारखी एआय टूल्स समाविष्ट आहेत.

:  Oppo F31 Series मध्ये Pro+, Pro आणि F31 5G चा समावेश; पहा काय आहेत फीचर्स

Photo Credit: Oppo

Oppo F31 5G मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 SoC आहे

महत्वाचे मुद्दे
  • Oppo F31 Pro 5G,19 सप्टेंबरला विक्रीसाठी उपलब्ध होईल
  • भारतात Oppo F31 5G च्या बेस 8GB RAM + 128GB व्हेरिएंटची किंमत 22,999 रुपय
  • Oppo F31 5G हा ड्युअल-सिम हँडसेट आहे, जो Android 15-आधारित ColorOS 15 वर
जाहिरात

Oppo ने भारतामध्ये F31, F31 Pro, आणि F31 Pro+ 5G स्मार्ट्फोन्स भारतामध्ये लॉन्च केले आहेत. या फोनमध्ये दमदार 7,000 mAh battery चा समावेश आहे. 80W Super VOOC fast charging चा त्याला सपोर्ट आहे. नवीन सीरीज मध्ये 360 डिग्री आर्मर बॉडी डिझाइनसह मल्टी-लेयर शॉक अ‍ॅब्सॉर्प्शन, थेंब, धूळ आणि पाण्याच्या संपर्कापासून संरक्षण करण्यासाठी IP69, IP68 आणि IP66 रेटिंग्स आहेत. हे तिन्ही स्मार्टफोन ColorOS 15 वर चालतात आणि 2 वर्षांच्या OS updates आणि ३ वर्षांच्या security updatesच्या आश्वासनासह येतात.Oppo F31 Pro+ 5G, F31 Pro, F31 ची भारतातील उपलब्धता आणि किंमतOppo F31 हा Midnight Blue, Cloud Green, आणि Bloom Red रंगांमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्ट्फोनची किंमत 8GB + 128GB साठी Rs. 22999, 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत Rs. 24,999 आहे. तर Oppo F31 Pro हा फोन Desert Gold आणि Space Greyरंगात उपलब्ध असेल. 8GB + 128GB ची किंमत Rs. 26,999 आणि 8GB + 256GB ची किंमत Rs. 28,999 आणि 12GB + 256GB ची किंमत Rs. 30,999 आहे.

Oppo F31 Pro+ 5G हा स्मार्टफोन Gemstone Blue, Himalayan White,आणि Festive Pink रंगामध्ये उपलब्ध आहे. तर त्याच्या 8GB + 256GB मॉडेलची किंमत Rs. 32,999 आणि 12GB + 256GB मॉडेलची किंमत Rs. 34,999 आहे.

Oppo F31 मध्ये 6.57-इंचाचा FHD+ 120Hz OLED डिस्प्ले, MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर आणि 8GB/12GB RAM सह 128GB/256GB स्टोरेज आहे. यात Android 15 आधारित ColorOS 15.0, 50MP OIS रिअर कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनमध्ये 7000mAh बॅटरीसह 80W फास्ट चार्जिंग, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

Oppo F31 Pro 5G मध्ये 6.57-इंचाचा FHD+ 120Hz OLED डिस्प्ले, MediaTek Dimensity 7300-Energy प्रोसेसर आणि 8GB RAM सह 128GB/256GB UFS 3.1 स्टोरेज आहे. यात Android 15 आधारित ColorOS 15.0, 50MP OIS रिअर कॅमेरा आणि 32MP फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनमध्ये 7000mAh बॅटरीसह 80W फास्ट चार्जिंग, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, स्टिरिओ स्पीकर्स दिले आहे.

Oppo F31 Pro+ 5G मध्ये 6.8-इंचाचा FHD+ 120Hz OLED डिस्प्ले, Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर आणि 8GB/12GB RAM सह 256GB स्टोरेज दिले आहे. यात 50MP OIS रिअर कॅमेरा, 32MP फ्रंट कॅमेरा, Android 15 आधारित ColorOS 15.0 आहे. फोनला 7000mAh बॅटरीसह 80W फास्ट चार्जिंग आणि स्टिरिओ स्पीकर्स आहेत.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. ॲपलकडून iOS 26 अपडेटसह iPadOS 26 व macOS Tahoe लॉन्च; पहा पात्र डिव्हाईसची यादी
  2. : Oppo F31 Series मध्ये Pro+, Pro आणि F31 5G चा समावेश; पहा काय आहेत फीचर्स
  3. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये Nothing Phone 3 अवघ्या 34,999 रूपयांत विकत घेण्याची संधी
  4. Realme P3 Lite 5G भारतात लॉन्च; पहा किंमत, स्पेसिफिकेशन्स काय
  5. iQOO 15 मध्ये 2K Samsung AMOLED डिस्प्ले; समोर आली माहिती
  6. Realme चा नवा P-Series स्मार्टफोन P3 Lite 5G आला दमदार फीचर्स आणि किफायतशीर किंमतीमध्ये
  7. भारतीयांना iPhone 17 Series आणि iPhone Air मिळवण्यासाठी करावी लागणार प्रतिक्षा
  8. Poco M7 Plus 5G चा नवा 4GB RAM व्हेरिएंट भारतात येतोय; पहा लॉन्च कधी
  9. पहिल्यांदाच समोर आले Nothing Ear 3 चे डिझाइन; पहा अपडेट्स
  10. Flipkart ची iPhone 14 साठी सर्वात स्वस्त डील; पहा अ‍पडेट्स
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »