Oppo Find X9 Pro मध्ये 6.78 इंचाचा डिस्प्ले असल्याचा अंदाज आहे तर Oppo Find X9 Pro मध्ये 7000mAh रेंजमध्ये बॅटरी असण्याची शक्यता आहे.
Photo Credit: Oppo
Oppo X9 Pro मध्ये Oppo Find X8 Pro पेक्षा पातळ बेझल मिळू शकतात (चित्रात)
मागील वर्षी च्या Oppo Find X8 Pro प्रमाणे यंदा देखील Find X9 Pro हा स्मार्टफोन चीन मध्ये येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात लॉन्च होण्याचा अंदाज आहे. Oppo Find X9 Pro चे काही लीक्स सध्या ऑनलाईन मीडीयात समोर आले आहेत. एका टिपस्टरने दिलेल्या माहितीनुसार, Oppo Find X9 Pro मध्ये त्याच्या आधीच्या फोनपेक्षा अधिक क्षमतेची बॅटरी असू शकते. या हँडसेटच्या इतर फीचर्स बद्दल देखील माहिती देण्यात आली आहे, ज्यामध्ये त्याची चिपसेट, आयपी रेटिंग आणि अन्य स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर येत आहे. मग पहा या आगामी स्मार्टफोनबद्दलचे सारे अपडेट्स काय?
Oppo Find X9 Pro मध्ये 6.78-inch 1.5K LTPO AMOLED display आणि 1.5K resolution, Low-Injection Pressure Over-Moulding (LIPO) technology असल्याची माहिती चीनी टिपस्टर Digital Chat Station (DCS) ने ऑनलाईन माध्यमातून दिली आहे. Oppo Find X9 Pro हा स्मार्टफोन thinner bezels चा असल्याचे यावरून संकेत मिळत आहेत. शिवाय, चिनी ब्रँड त्यांच्या फ्लॅगशिप हँडसेटमध्ये पूर्वी समाविष्ट केलेल्या curved design काढून टाकत त्याऐवजी फ्लॅट पॅनेलसह Find X9 Pro बाजारात आणू शकतो.
टिपस्टरच्या माहितीनुसार, Oppo Find X9 Pro हा फोन MediaTek च्या आगामी Dimensity 9500 SoC द्वारे सपोर्टेड असेल. फोटो आणि व्हिडिओंसाठी, त्याच्या मागे 200MP periscope telephoto lens असल्याचे म्हटले जाते, जे त्याच्या आधीच्यामध्ये फीचर्ड 50MP telephoto sensor पेक्षा मोठा असेल.
Oppo Find X9 Pro मध्ये 7000mAh रेंजमध्ये बॅटरी असण्याची शक्यता आहे, ज्याचा सर्वाधिक अंदाज 7,500mAh च्या आसपास आहे. हे Oppo Find X8 Pro पेक्षा खूप मोठे अपग्रेड असेल, ज्यामध्ये 5,910mAh सेल होता. अचूक वायर्ड चार्जिंग स्पीडबद्दल तपशील अद्याप अस्पष्ट असले तरी, हा स्मार्टफोन 50W वायरलेस चार्जिंग आणि 80W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल अशी अपेक्षा आहे.
फोनमधील या फीचर्स व्यतिरिक्त, DCS ने असेही नमूद केले आहे की Find X9 Pro ला ultrasonic in-display fingerprint sensor, तसेच सुधारित धूळ आणि पाण्याला रोखण्यासाठी IP68 आणि IP69 रेटिंग मिळणार आहे असा अंदाज आहे.
Oppo Find X9 Pro ची ही स्पेसिफिकेशन्स दमदार आहेत, विशेषतः चिपसेट आणि बॅटरी पेअरिंग, त्यामुळे कंपनीचे स्पर्धक कसे प्रतिसाद देतात हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे ओप्पो च्या या स्मार्टफोनमुळे ग्राहकांमध्येही उत्सुकता वाढली आहे.
जाहिरात
जाहिरात