IMC 2025 मध्ये, टेक फर्मने नोव्हेंबरमध्ये भारतात Find X9 Series लाँच करणार असल्याचे सांगितले होते. मात्र त्यांनी नेमकी लाँच तारीख जाहीर केली नाही.
Photo Credit: oppo
दोन्ही फोन्समध्ये Dimensity 9500, 16GB RAM, 1TB स्टोरेज
Find X9 Pro आणि Find X9 या Oppo Find X9 series ची घोषणा चीन मध्ये झाली आहे. यासोबतच Watch S आणि Pad 5 च्या ग्लोबल लॉन्चची घोषणा करण्यात आली आहे. हा लाईनअप 28 ऑक्टोबर दिवशी लॉन्च केला जाणार आहे. आता कंपनी कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, Oppo Find X9 Pro,Find X9 हे भारतामध्येही लॉन्च केले जाणार आहेत. मात्र त्याची नेमकी तारीख गुलदस्त्यामध्ये आहे. त्यामुळे जाणून घ्या ओप्पोच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये काय आहेत खास फीचर्स?
ओप्पो कडून जारी प्रेस रीलीज नुसार Oppo Find X9 series भारतामध्येही लवकरच जाहीर होणार आहे. भारतामध्ये Find X9 हा Titanium Grey आणि Space Black रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. दरम्यान Find X9 Pro हा Silk White आणि Titanium Charcoal रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.
Oppo Find X9 Pro आणि Find X9 हे फोन्स 28 ऑक्टोबर दिवशी ग्लोबल मार्केट मध्ये लॉन्च होणार आहे. त्याचा सोहळा बार्सोलोना मध्ये होणार आहे. हे फोन गुरुवारी चीनमध्ये लाँच झाले आणि 22 ऑक्टोबर रोजी देशात विक्रीसाठी उपलब्ध होतील. Find X9 Pro कंपनीच्या ऑनलाइन स्टोअरद्वारे तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल.
इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) 2025 मध्ये, टेक फर्मने नोव्हेंबरमध्ये भारतात ही लाइनअप लाँच करणार असल्याचे उघड केले होते. तथापि, त्यांनी नेमकी लाँच तारीख जाहीर केली नाही. अलीकडेच, एका टिपस्टरने खुलासा केला की Oppo Find X9 मालिका 18 नोव्हेंबर रोजी भारतात लाँच होईल.
जाहिरात
जाहिरात