Find X9 series, MediaTek Dimensity 9500 SoC सोबत लॉन्च होणार असून त्याला 16GB of RAM आणि 1TB internal storage सोबत जोडले जाणार आहे.
Photo Credit: Oppo
दोन्ही फोन IP66/IP68/IP69 रेटिंगसह धूळ-पाण्यापासून सुरक्षित आहेत
चीनमध्ये Oppo Find X9 Pro हा गुरूवारी कंपनीच्या हार्डवेअर लॉन्च ईव्हेंट मध्ये बेस Oppo Find X9 मॉडेल सोबत लॉन्च झाला आहे. त्यामध्ये MediaTek Dimensity 9500 SoCs चा समावेश असून Android 16 बेस्ड ColorOS 16 वर तो चालणार आहे. दोन्ही फोन हे Hasselblad-backed कॅमेरासोबत आहेत, त्यामध्ये 50-megapixel Sony LYT 828 primary sensors चा समावेश आहे. दरम्यान प्रो व्हेरिएंट मध्ये 200-megapixel periscope telephoto shooter चा समावेश असून vanilla model हे 50-megapixel telephoto camera सोबत येणार आहे. हा फोन IP66, IP68आणि IP69 रेटिंग असल्याने तो धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे.
Oppo Find X9 Pro आणि Find X9 मध्ये अनुक्रमे 6.78-inch आणि 6.59-inch डिस्प्लेसह लॉन्च होणार आहे. त्यामध्ये 1.5K resolution आहे तर 120Hz refresh rate आहे. लोकल पीक ब्राईटनेस 3600 nits over 20 percent जाणार आहे. दोन्ही फोन full-screen Always-On Display फीचर सह येणार आहेत. Find X9 series, MediaTek Dimensity 9500 SoC सोबत लॉन्च होणार असून त्याला 16GB RAM आणि 1TB internal storage सोबत जोडले जाणार आहे.
फोटो आणि व्हिडिओसाठी, Oppo Find X9 मालिकेत 50 MP सोनी LYT-828 प्रायमरी कॅमेरे आणि 50 MP सॅमसंग JN5 अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. प्रो मॉडेलमध्ये 200 मेगापिक्सेल पेरिस्कोप टेलिफोटो शूटर आहे, तर स्टॅडर्ड प्रकारात 50 MP टेलिफोटो सेन्सर आहे. समोर, Find X9 Pro आणि Find X9 मध्ये अनुक्रमे 50 MP आणि 32 MP सेल्फी कॅमेरे आहेत. Oppo Find X9 Pro आणि Find X 9 मध्ये अनुक्रमे 7500mAh आणि 7025 mAh बॅटरी आहेत, ज्या 80W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह आहेत.
व्हेरिएंट | Oppo Find X9 किंमत | Oppo Find X9 Pro किंमत |
12GB + 256GB | 4,399 Yuan / रू. 54,300 | 5,299 Yuan /रू.65,400 |
12GB + 512GB | 4,999 Yuan / रू. 61,700 | 5,699 Yuan / रू.70,300 |
16GB + 256GB | 4,699 Yuan / रू. 58,000 | — |
16GB + 512GB | 5,299 Yuan /रू. 65,400 | 5,999 Yuan / रू.74,100 |
16GB + 1TB | 5,799 Yuan / रू. 71,600 | 6,699 Yuan / रू. 82,700 |
जाहिरात
जाहिरात