Oppo Find X9 लाइनअप ColorOS 16 based on Android 16 सह येईल, ज्यामध्ये अॅपल डिव्हाइसेसवर आढळणाऱ्या काही फीचर्ससाठी नेटिव्ह सपोर्ट समाविष्ट आहे.
Photo Credit: Weibo
ओप्पो फाइंड एक्स९ (डावीकडे) मध्ये फ्लॅट डिस्प्ले असेल
iPhone 17 च्या लॉन्चनंतर अनेक कंपन्यांनी त्याच्या स्पर्धेत उतरत आपल्या आगामी फोन्सची माहिती दिली आहे. Oppo चे Zhou Yibao यांनी Find X9 सिरीजसंबंधी काही माहिती आणि काही फोटो शेअर केले आहेत. Oppo ने आपल्या Find X9 सिरीजचे तपशील जाहीर केले आहेत. Oppo Find X9 Pro मध्ये तब्बल 7,500mAh ची बॅटरी आणि 8.25mm जाडीचा हा फोन असणार आहे. तर Find X9 मध्ये 7,025mAh बॅटरी आणि फोनची जाडी 7.99mm असणार आहे. वजनाच्या दृष्टीने, X9 Pro अंदाजे 224g आणि Find X9 सुमारे 203g असेल. डिस्प्ले साईजमध्ये थोडा फरक आहे. Pro मध्ये 6.78-इंचाचा स्क्रीन, तर Find X9 मध्ये 6.69-इंचाचा स्क्रीन असेल.
Zhou यांच्या पोस्टनुसार, X9 सिरीजमध्ये 'cold carvin' तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे आणि या सिरीजचा प्रमुख रंग “टायटॅनियम” असेल पण चेसिस बहुधा अॅल्युमिनियमचे असेल. विशेष म्हणजे, स्क्रीनमध्ये डोळ्यांचे संरक्षण करणारे तंत्रज्ञान असेल आणि मोशन सिकनेस कमी करणारा मोड देखील दिला जाईल.
संपूर्ण X9 सिरीज फ्लॅट डिस्प्लेसह येणार असून, आतापर्यंतच्या सर्वात पातळ बेझल्ससह असेल. फोनच्या चारही बाजूंनी समान (अद्याप पुष्टी नसलेल्या माहितीनुसार जाडी फक्त 1.1mm असेल).
Zhou यांच्या मते, X9 मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी बदल केले जातील. तसेच हे फोन ColorOS 16 वर चालतील, ज्यामध्ये Apple gadgets साठी नेटिव्ह सपोर्ट असेल. याचे प्रदर्शन Zhou यांनी AirPods 4 Find X9 सोबत पेअर करून केले.
लीक झालेल्या स्पेसिफिकेशन्सनुसार, Find X9 आणि X9 Pro हे दोन्ही फोन Dimensity 9500 प्रोसेसरवर चालतील आणि त्यामध्ये 80W फास्ट वायर्ड चार्जिंग असेल. या फोनमध्ये आता अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट रीडर दिला जाणार आहे (X8 सिरीजमध्ये ऑप्टिकल होता). याशिवाय, एक नवीन स्मार्ट बटण म्हणजेच “प्लस की” असणार आहे.
Oppo Find X9 मध्ये मागील बाजूस तीन 50MP कॅमेरे असतील, तर Oppo Find X9 Pro मध्ये 200MP पेरिस्कोप कॅमेरा मिळणार आहे. यांचे अधिकृत अनावरण ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. Zhou यांच्या म्हणण्यानुसार लीक झालेले Find X9 मॉडेल्सचे इमेजेस फारसे अचूक नाहीत. Oppo Find X9 सीरीज ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत आधी चीनमध्ये लाँच होण्याचा अंदाज आहे, तर ग्लोबल मार्केट मध्ये २८ ऑक्टोबर रोजी फोन लाँच होण्याची शक्यता आहे. पण लाँचची नेमकी तारीख अद्याप अधिकृतपणे निश्चित झालेली नाही.
जाहिरात
जाहिरात