Oppo K13 सिरीजमध्ये बॅटरीची कॅपेसिटी वाढलेली आहे, AMOLED डिस्प्लेवर higher refresh rate आहेत आणि heat management सुधारण्यासाठी बिल्ट-इन कूलिंग फॅन आहे.
Photo Credit: Oppo
ओप्पो के१३ टर्बो सिरीज IPX6, IPX8 आणि IPX9 वॉटर रेझिस्टन्स रेटिंग पूर्ण करते असा दावा केला जातो
Oppo कडून K13 Turbo series मध्ये 2 नवे स्मार्टफोन्स घोषित करण्यात आले आहेत. K13 Turbo Pro आणि K13 Turbo असे हे नवे स्मार्टफोन्स आहेत. यामधील टॉप-एंड व्हेरिएंट Poco F7 आणि OnePlus 13R सारख्या स्मार्टफोनशी स्पर्धा करेल, तर व्हॅनिला व्हर्जन OnePlus Nord 5 आणि iQOO Neo 10R सारख्या स्मार्टफोनशी थेट स्पर्धा करेल. गेमर्स ना केंद्र ठेवून आणलेल्या या स्मार्टफोन मध्ये काय असेल खास? ते जाणून घेण्यासाठी पहा या स्मार्टफोनच्या किंमती आणि फोन बद्दलची अन्य खास फीचर्सOppo K13 Turbo series मधील फोनची किंमत आणि रंगांची उपलब्धता,Oppo K13 Turbo ची किंमत 27,999 रूपये आहे. हा स्मार्टफोन 8GB RAM/128GB storage variant चा आहे तर 8GB RAM/256GB स्टोरेज साठी ग्राहकांना 29,999 रूपये मोजावे लागणार आहेत. 18 ऑगस्ट पासून या फोनची विक्री सुरू होणार आहे. लॉन्च ऑफर मध्ये फोनच्या किंमतींवर सूट जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सुरूवातीला हा फोन 24,999 आणि 26,999 मध्ये मिळणार आहे.
K13 Turbo Pro ची किंमत 37,999 रूपयांपासून सुरू होते. ही किंमत 8GB RAM/256GB स्टोरेज व्हेरिएंटची आहे. तर 12GB RAM/256GB व्हेरिएंटची किंमत 39,999 रूपये आहे. हा फोन 15 ऑगस्ट पासून विक्रीसाठी खुला असणार आहे. ऑफर मध्ये या फोन्सची किंमत 34,999 आणि 36,999 रूपये असणार आहे.
Oppo K13 Turbo series मधील फोन ग्राहकांना फ्लिपकार्ट, ओप्पो ची वेबसाईट आणि कंपनीच्या रिटेल पार्टनर्स कडे खरेदी करता येणार आहे. Oppo K13 Turbo Pro हा सिल्व्हर नाइट, पर्पल फँटम आणि मिडनाईट मॅव्हरिक रंगांमध्ये उपलब्ध आहे. तर, K13 Turbo स्मार्टफोन नाइट व्हाइट, फर्स्ट पर्पल आणि मिडनाईट मार्व्हियर रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Oppo K13 Turbo Pro मध्ये 6.8-inch LTPS AMOLED display आणि 120Hz refresh rate आहे. K13 Turbo आणि Turbo Pro दोन्ही IPX9 रेटिंगसह येतात, म्हणजेच ते 30 मिनिटे 1.5 मीटर पाण्यात बुडून राहिल्यास ते सहन करू शकतात, परंतु धूळ संरक्षण नाही. K13 Turbo नवीन MediaTek Dimensity 8450 प्रोसेसरवर चालतो जो 8GB पर्यंत रॅम आणि 128/256GB स्टोरेजला सपोर्ट करतो. अतिरिक्त फीचर्स मध्ये 7,000mAh बॅटरी आणि 80 वॅट फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट करणारे आहे.या फोनमध्ये 5जी कनेक्टिव्हिटी, यूएसबी-सी ऑडिओ, स्टीरिओ स्पीकर्स आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे.
जाहिरात
जाहिरात