Photo Credit: Oppo
Oppo K13x 5G मध्ये 360-डिग्री डॅमेज-प्रूफ आर्मर बॉडी असल्याचा दावा केला जात आहे
Oppo कडून K13x 5G handset च्या भारतामधील लॉन्च साठीची तयारी सुरू झाली आहे. ओप्पो फोन कंपनी कडून फोन कोणत्या रंगांमध्ये येणार आहे याची माहिती देण्यात आली आहे. ओप्पोच्या माहितीनुसार, त्यांनी फोनमध्ये Sponge Biomimetic Shock Absorption System चा वापर केला आहे. हा sea sponges कडून प्रेरित आहे. Oppo K13x ची भारता मधील किंमत 16 हजार पेक्षा कमी असण्याचा अंदाज आहे. Oppo K13x 5G हा गेल्या वर्षी लाँच झालेल्या Oppo K12x 5G च्या पुढील स्मार्टफोन असेल. येणाऱ्या स्मार्टफोनमध्ये कॅमेरा मॉड्यूलमध्ये बदल होणार असल्याचे सांगितले जात आहे. नवीन Oppo K13x 5G स्मार्टफोनमध्ये 'AI कॅमेरा सिस्टम' असू शकते ज्यामध्ये AI-ची महत्त्वाची फीचर्स असू शकतात. Flipkart ने Oppo K13x 5G साठी लॅन्डिग पेज बनवले असून त्याच्या द्वारा आता या फोनच्या लॉन्च साठीचे संकेत दिले जात आहेत.
Oppo K13x 5G मध्ये Sponge Biomimetic Shock Absorption System, आहे. हे एका प्रेस रीलीज मधून सांगण्यात आले आहे. कंपनीने स्पष्ट केले की, ते त्याच्या अंतर्गत भागांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यासाठी स्पंजसारख्या थरांसह लवचिक, धक्के शोषून घेणारे साहित्य वापरते. Oppo K13x 5G मध्ये AM04 high-strength aluminium alloy inner frame चा वापर करण्यात आला आहे. हा अन्य alloys पेक्षा 10% अधिक टिकाऊ आहे. Oppo च्या माहिती नुसार, फोन Anti-Drop Shield Case सह दिला जाणार आहे.
टीझरमधील अपडेट्स नुसार Oppo K13x 5G मध्ये डॅमेज प्रूफ 360-डिग्री आर्मर बॉडी असेल जी फॉल प्रूफ असेल. फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप असल्याचे दिसून येते ज्यामध्ये मागीलपेक्षा थोडा वेगळा फ्लॅश मॉड्यूल आहे. Opo K13x 5G वर साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर असल्याचे दिसून येते.
Oppo K13x लाँच झाल्यानंतर फक्त फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. या फोनची किंमत त्याच्या आधीच्या फोनप्रमाणेच असू शकते. सध्या, Oppo K12x ची किंमत 12,999 रुपये आहे आणि K13x 5G ची किंमत त्याच रेंजपासून सुरू होईल असे म्हटले जाते. Oppo K13x 5G मिडनाईट व्हायलेट आणि सनसेट पीच रंग पर्यायांमध्ये लिस्टेट केला जाईल.
जाहिरात
जाहिरात