Oppo ने अशीही पुष्टी केली आहे की K13x 5G मध्ये टिकाऊ बिल्ड, दीर्घकाळ टिकणारी बॅटरी, AI-पॉवर वर चालणारे कॅमेरे आणि अल्ट्रा-फास्ट चार्जिंग स्पीड असेल.
Photo Credit: Oppo
Oppo K13 5G (चित्रात) 8GB + 128GB पर्यायाची किंमत रु. 17,999 होती
Oppo कडून K13x 5G स्मार्टफोन लवकरच भारतामध्ये लॉन्च केला जाणार आहे. हा फोन कंपनीच्या K Series lineup मधील पुढील फोन असणार आहे. भारतात लॉन्च होणारा हा या वर्षामधील दुसरा K-series smartphone आहे. OPPO K13 बद्दल अद्याप कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही पण ऑनलाईन क्षेत्रात त्याची चर्चा सुरू आहे. OPPO K13 लॉन्च झाल्यानंतर अधिकृतपणे ओप्पो च्या ई-स्टोअरसह फ्लिपकार्ट द्वारे देशात खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. आता, एका नवीन अहवालात त्याच्या रिटेल बॉक्सची 'alleged image' शेअर केली आहे, जी Oppo K13x 5G ची डिझाइन आणि प्राईज रेंजची माहिती देत आहे.मीडीया रिपोर्ट्सनुसार, retail box of the Oppo K13x 5G smartphone, नुसार या फोनची किंमत 15,999 पेक्षा कमी आहे. सोबतच फोनच्या पुढील भागाची इमेज देखील लीक झाली आहे. या फोनचे कॉनर्स राऊंडेड असणार आहेत.
तर फ्लॅट डिस्प्ले असेल. वरच्या बाजूला पंच होल सेल्फी कॅमेरा असणार आहे. ही फीचर्स काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या स्मार्टफोनच्या अधिकृत टीझरशी जुळणरी आहेत. Oppo ने अशीही पुष्टी केली आहे की K13x 5G मध्ये टिकाऊ बिल्ड, दीर्घकाळ टिकणारी बॅटरी, AI-पॉवर वर चालणारे कॅमेरे आणि अल्ट्रा-फास्ट चार्जिंग स्पीड असतील. हा फोन फ्लिपकार्ट आणि OPPO च्या अधिकृत वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध असतील.
अलिकडच्या अहवालांमध्ये असे म्हटले आहे की Oppo K13x 5G मध्ये MediaTek Dimensity 6300 SoC असेल आणि 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली मोठी 6,000mAh बॅटरी असेल. फोनचा कॅमेरा पाहता यात 50MP चा मुख्य सेन्सर आणि मागील बाजूस 2MP चा दुय्यम सेन्सर असेल, तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 8MP चा फ्रंट स्नॅपर असेल असे म्हटले जाते.
Oppo K13x 5G मध्येही फोनची डिझाइन टिकाऊ आणि बॅटरी सायकल लाइफ जास्त असण्याची अपेक्षा आहे. जे दीर्घायुष्य आणि कामगिरीला प्राधान्य देणाऱ्या युजर्सला लक्ष्य करेल.
K13x 5G च्या लॉन्च सह फोनची किंमत आणि संपूर्ण तपशील याची माहिती अद्याप अधिकृतपणे देण्यात आलेली नाही. पण यापूर्वीच्या K12x 5G ची किंमत 6GB + 128GB variant साठी सुमारे 12,999 होती. हा फोन 8GB RAM आणि 256GB internal storage च्या कॉन्फ्युगरेशन पर्यंत उपलब्ध आहे.
जाहिरात
जाहिरात
Microsoft Announces Latest Windows 11 Insider Preview Build With Ask Copilot in Taskbar, Shared Audio Feature
Samsung Galaxy S26 Series Specifications Leaked in Full; Major Camera Upgrades Tipped