Photo Credit: Oppo
Oppo Reno 13 series चीन मध्ये लवकरच लॉन्च होणार आहे. कंपनी कडून फोनच्या लॉन्च डेट ची तारीख जाहीर केली आहे. यावेळी त्यांनी फोनचे डिझाईन, रॅम आणि स्टोरेज याबद्दल माहिती दिली आहे. हा मोबाईल एकाच रंगामध्ये उपलब्ध असणार आहे. ही सीरीज बेस मॉडेल, प्रो व्हेरिएंट मध्ये उपलब्ध असणार आहे. हा फोन Oppo Reno 12 आणि Reno 12 Pro च्या पुढील फोन आहे.
Oppo Reno 13 Series हा फोन चीन मध्ये 25 नोव्हेंबर दिवशी संध्याकाळी 7 (4:30pm IST)वाजता लॉन्च होणार आहे अशी माहिती Weibo वरील पोस्ट मध्ये दिली आहे. हा फोन Butterfly Purple रंगामध्ये उपलब्ध असणार आहे. उर्वरित रंगांची माहिती लवकरच दिली जाण्याची शक्यता आहे. या फोन सोबतच Oppo Pad 3 आणि Oppo Enco R3 Pro TWS earphones देखील लॉन्च केले जाणार आहेत.
Oppo China e-store च्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन 5 व्हेरिएंट मध्ये असणार आहे. त्यामध्ये 12GB + 256GB, 12GB + 512GB, 16GB + 256GB, 16GB + 512GB आणि 16GB + 1TB उपलब्ध असणार आहे.
X user @chunvn8888, च्या माहितीनुसार Oppo Reno 13 series हा फोन जगभर जानेवारी 2025 मध्ये लॉन्च होण्याचा अंदाज आहे. यापूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार Reno 13 हॅन्डसेट भारतामध्ये याच वेळेच्या आसपास येणार आहे.
Oppo Reno 13 चे दोन्ही vanilla आणि Pro variants मध्ये MediaTek Dimensity 8300 chipsets आहेत. यापूर्वीच्या लिक्स मधील माहितीनुसार, Oppo Reno 13 Pro मध्ये प्रतिक्षेमध्ये असलेल्या MediaTek Dimensity 8350 chipset सह लॉन्च होण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, Oppo Reno 13 Pro ची चीनी आवृत्ती असण्याची अपेक्षा असलेले मॉडेल क्रमांक PKK110 असलेला Oppo हँडसेट Geekbench वर दिसला आहे. CPU आणि GPU कॉन्फिगरेशन नुसार, त्यात MediaTek Dimensity 8300 SoC असू शकते. फोन 16GB रॅमला सपोर्ट करतो आणि Android 15 वर चालतो असा अंदाज आहे.
जाहिरात
जाहिरात