Photo Credit: Oppo
Oppo Reno 13 series चीन मध्ये नोव्हेंबर महिन्यात लॉन्च झाला आहे. या लाईनअप मध्ये बेस आणि Reno 13 Pro व्हेरिएंटचा समावेश होता. आता हा हॅन्डसेट भारतामध्ये येण्यासाठी सज्ज झाला आहे. आता या फोनच्या लाईनअपची माहिती आणि डिझाईन, रंग यांची माहिती समोर आली आहे. या फोनच्या उपलब्धतेबद्दल माहिती समोर आली आहे. Reno 13 series चं इंडियन व्हर्जन देखील चायनीज मॉडेल सारखं असणार आहे. हा हॅन्डसेट Reno 13 series आणि Reno 13 seriesचा उत्तराधिकारी असणार आहे.
X post मध्ये Oppo ने दिलेल्या माहितीनुसार, Oppo Reno 13 5G series लवकरच भारतामध्ये लॉन्च होणार आहे. अद्याप त्याची ठोस तारीख सांगण्यात आलेली नाही. Flipkart आणि Oppo India e-store द्वारा देखील खरेदी करता येणार आहे.
Oppo Reno 13 series चे हॅन्डसेट आता दोन रॅम आणि स्टोरेज पर्यायांमध्ये येणार आहेत. या फोनचा बेस व्हर्जन Ivory White रंगामध्ये आणि केवळ भारतामध्ये Luminous Blue रंगामध्ये उपलब्ध होणार आहे. या फोनचा प्रो व्हेरिएंट Graphite Grey आणि Mist Lavender या रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.
Ivory White व्हर्जन चा 7.24mm profile असणार आहे. तर Luminous Blue version 7.29mm आकारात असणार आहे. दोन्ही व्हेरिएंटस चं वजन 181g आहे. Oppo Reno 13 Pro स्मार्टफोन 7.55mm जाडीचा आहे आणि वजन 195 ग्राम आहे. दोन्ही फोनला aerospace-grade aluminium frame आहे.
दोन्ही Oppo Reno 13 आणि Reno 13 Pro मध्ये sculpted glass back panels असणार आहेत. OLED screens,Corning Gorilla Glass 7i display protection असणार आहे. बेस मॉडेल मध्ये 1.81mm thin bezel आणि 93.4 percent screen-to-body ratio सह असणार आहे. प्रो व्हेरिएंट 1.62mm bezel आणि 93.8 percent screen-to-body ratio सह असणार आहे.
चीन मध्ये या फोनमध्ये MediaTek Dimensity 8350 chipsets असणार आहे. Android 15-based ColourOS 15 वर तो चालतो. दोन्ही फोनला IP69 rating असल्याने तो धूळ, पाण्यापासून सुरक्षित असणार आहे. base Oppo Reno 13 फोनमध्ये 50-megapixel selfie shooters असणार आहे. Reno 13 Proमध्ये third 50-megapixel telephoto sensor असणार आहे.
जाहिरात
जाहिरात