Photo Credit: Oppo
Oppo Reno 13 आणि Reno 13 Pro चीन मध्ये नोव्हेंबर 2024 मध्ये लॉन्च झाल्यानंतर आता हे हॅन्डसेट्स जगभर उपलब्ध होणार आहेत. या फोनच्या ग्लोबल लॉन्च सोबत आता 2 अजून नवी डिव्हाईस बाजारात येणार आहेत. Oppo Reno 13F 5G आणि Reno 13F 4G बाजारात येणार आहे. Oppo Reno 13F व्हेरिएंट मध्ये 50-megapixel triple rear camera युनिट आहे. 5,800mAh बॅटरीज आणि 45W wired SuperVOOC charging सपोर्ट आहे. यामध्ये IP66, IP68 आणि IP69 रेटींग सपोर्ट असल्याने फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहणार आहे.
Oppo Reno 13F 5G ला 8GB + 128GB, 8GB + 256GB, 12GB + 256GB,आणि 12GB + 512GB व्हेरिएंट्स सोबत लिस्ट करण्यात आले आहे. दरम्यान Oppo Reno 13F 4G लिस्टिंग द्वारा फोन 8GB + 256GB आणि 8GB + 512GB व्हेरिएंट मध्ये उपलब्ध राहणार आहे.
Oppo कडून अद्याप Oppo Reno 13 series फोनच्या किंमतींबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. लवकरच हे स्मार्टफोन APAC (Asia-Pacific) region मध्ये उपलब्ध होणार आहेत. Oppo Reno 13F मॉडेल हा Graphite Grey आणि Plume Purple रंगामध्ये उपलब्ध आहे. 5G variant हा निळ्या रंगामध्ये उपलब्ध आहे. तर 4G version हे Skyline Blue रंगामध्ये उपलब्ध असणार आहे.
Oppo Reno 13 आणि Reno 13 Pro हे फोन भारतामध्ये 9 जानेवारीला लॉन्च होणार आहेत. मात्र भारतामध्ये Reno 13F handsets कधी येणार याची माहिती मिळू शकलेली नाही.
Oppo Reno 13F 5G,Reno 13F 4G ची स्पेसिफिकेशन्स
Oppo Reno 13F 5G,Reno 13F 4G मध्ये 6.67-inch full-HD+ OLED displays आहे. तर AGC DT Star2 protection आहे. 5G variant मध्ये Snapdragon 6 Gen 1 SoC आहे. तर 4G हॅन्डसेट मध्ये MediaTek Helio G100 chipset आहे. दरम्यान दोन्ही फोनमध्ये Android 15-based ColorOS 15 आहे.
Oppo Reno 13F 5G आणि Reno 13F 4G मध्ये 50-megapixel primary rear sensor आहे. तर 8-megapixel ultrawide आणि 2-megapixel macro unit आहे. फोनमध्ये 32-megapixel front camera सेल्फीसाठी आणि व्हिडिओ कॉल साठी आहे. या दोन्ही स्मार्टफोन्सना IP66, IP68 आणि IP69 ratings आहे. त्यामुळे फोन धूळ, पाण्यापासून सुरक्षित राहणार आहे. सुरक्षेसाठी in-display fingerprint sensors आहे. तर कनेक्टीव्हिटीसाठी Wi-Fi, Bluetooth, GPS, NFC, आणि USB Type-C port आहे.
ces_story_below_text
जाहिरात
जाहिरात