Oppo Reno 14 5G स्मार्टफोन लवकरच Amazon, Flipkart द्वारा भारतातही येणार; झलक आली समोर

OPPO Reno 14 Pro ची भारतामधील किंमत Rs 49,999 ते Rs 54,999 दरम्यान असण्याचा अंदाज आहे.

Oppo Reno 14 5G स्मार्टफोन लवकरच Amazon, Flipkart द्वारा भारतातही येणार; झलक आली समोर

Photo Credit: Oppo

ओप्पो रेनो १४ प्रो मध्ये ६.८३-इंचाचा ओएलईडी स्क्रीन आहे

महत्वाचे मुद्दे
  • Reno 14 series मध्ये फोनच्या कॅमेर्‍यात आणि एआय फीचर्स मध्ये अपग्रेड्स म
  • Oppo Reno 14 5G आणि Reno 14 Pro 5G हा स्मार्टफोन मलेशिया मध्ये 1 जुलै दि
  • Oppo, Reno 14 सीरीज फोन्स प्री ऑर्डर्स साठी उपलब्ध असताना सुमारे 200 RM म
जाहिरात

Oppo कडून Reno 14 series चं टेस्टिंग सुरू झालं आहे त्यामुळे आता लवकरच हा स्मार्टफोन भारतामध्ये येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भारतापूर्वी हा फोन जगात काही निवडक देशांमध्ये लॉन्च करण्याची सुरू झाली आहे. लवकरच कंपनी कडून मागील वर्षीप्रमाणे यंदाही भारतात Reno 14 आणि Reno 14 Pro लॉन्च केला जाऊ शकतो असं सांगण्यात आले आहे. Flipkart teasers,नुसार ओप्पो च्या नव्या फोनच्या प्रतिक्षेत असणार्‍या ग्राहकांना Reno 14 series मध्ये फोनच्या कॅमेर्‍यात आणि एआय फीचर्स मध्ये अपग्रेड्स मिळू शकतात असा अंदाज आहे. अद्याप कंपनीने फोनच्या भारतातील लॉन्चची तारीख किंवा स्पेसिफिकेशन्स यांची माहिती दिलेली नाही पण त्याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.Oppo Reno 14 5G सीरीज MediaTek Dimensity चिपसेट्स सह मागील महिन्यात चीन मध्ये लॉन्च झाला आहे. आता फोन कंपनी कडून Oppo Reno 14 5G आणि Reno 14 Pro 5G हा स्मार्टफोन मलेशिया मध्ये लॉन्च केला जाणार आहे. चीन नंतर ग्लोबल मार्केट मध्ये आता फोन मलेशियामध्ये दाखल होत आहे.

Oppo Reno 14 5G आणि Reno 14 Pro 5G मलेशिया मध्ये लॉन्च

होण्याच्या तयारीत

Oppo ने आपल्या फेसबूक आणि एक्स हॅन्डल्स च्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, Oppo Reno 14 5G आणि Reno 14 Pro 5G हा स्मार्टफोन मलेशिया मध्ये 1 जुलै दिवशी संध्याकाळी 6 वाजता म्हणजे भारतीय वेळेनुसार, 3.30 वाजता लॉन्च होणार आहे. हा स्मार्टफोनचा लाईनअप OOO Music Festival दरम्यान लॉन्च केला जाणार आहे. हॅन्डसेट Vivo मलेशिया वेबसाइट द्वारा प्री ऑर्डर केला जाऊ शकतो.

प्री-ऑर्डर ऑफर्स

Oppo, Reno 14 सीरीज फोन्स प्री ऑर्डर्स साठी उपलब्ध असताना सुमारे 200 RM म्हणजे 40,000 रूपयांपर्यंत डिस्काऊंट मध्ये उपलब्ध होणार आहे. सोबत 2,396 RM म्हणजे 45,000 रूपयांपर्यंत गिफ्ट्स मिळणार आहेत. Oppo Reno 14 5G सीरीज भारतात लाँचची झलक दाखवण्यासाठी एक खास वेबपेज तयार करण्यात आले आहे.

Oppo Reno 14 5G सीरीज ची स्पेसिफिकेशन्स

मे महिन्यात चीनमध्ये Oppo Reno 14 5G आणि Reno 14 Pro 5G लाँच करण्यात आले होते. या फोनच्या भारतीय प्रकारांमध्ये त्यांच्या चिनी स्मार्टफोनप्रमाणे फीचर्स असण्याची अपेक्षा आहे.Reno 14 चा चिनी व्हेरिएंट 6.59-इंचाचा 1.5K फ्लॅट OLED स्क्रीन आणि MediaTek Dimensity 8350 प्रोसेसरसह येतो. यात 80 वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000mAh बॅटरी आहे.Reno 14 Pro मध्ये 1.5kरिझोल्यूशनसह 6.83-इंचाची ओएलईडी स्क्रीन, MediaTek Dimensity 8450 प्रोसेसर, 80W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6200mAh बॅटरी आहे.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. OnePlus Nord Buds 4 Pro भारतात १९ मार्चला लॉन्च होणार
  2. Samsung Galaxy M17 5G भारतात लॉन्च; ५०MP कॅमेरा आणि ५,०००mAh बॅटरीसह दमदार फीचर्स
  3. WhatsApp अपडेट: इमोजी टाइप करताच मिळणार संबंधित स्टिकर्स, iPhone युजर्ससाठी नवीन फीचर
  4. वनप्लस 15T चे डिझाइन आणि रंग पर्याय अधिकृतपणे जाहीर; चीन लॉन्चपूर्वी फीचर्स समोर
  5. iQOO Z11 Turbo चा टीझर समोर; लवकरच लॉन्च, जबरदस्त बॅटरी आणि फास्ट चार्जिंगची शक्यता
  6. SIM Binding नियम काय आहे? मेसेजिंग अॅप्स आणि वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार
  7. Poco C85x 5G लवकरच भारतात; Flipkart मायक्रोसाइटवर डिझाइनची झलक
  8. Google Pixel 10a भारतात विक्रीसाठी उपलब्ध; 48MP कॅमेरा, 5100mAh बॅटरीसह किंमत ₹49,999
  9. Motorola Edge 70 Fusion किंमत आणि उपलब्धता
  10. Nothing Phone 4a सीरिज भारतात लॉन्च; किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाहीर
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »