Reno 15 हा निळ्या रंगात लाँच होऊ शकतो, तर Reno 15 Pro सोनेरी रंगात सादर केला जाऊ शकतो. दोन्ही मॉडेल्स पांढऱ्या आणि तपकिरी रंगात येण्याची अपेक्षा आहे
Photo Credit: Oppo
Reno 15 Pro 6.78", Reno 15 6.59", Mini 6.32" पॅनल असतील
Oppo त्यांच्या आगामी नेक्स्ट जनरेशन Reno 15 flagship lineup ला भारतामध्ये लॉन्च करण्याच्या तयारीमध्ये आहेत. चीनमध्ये हा फोन 17 नोव्हेंबरला दाखल झाल्यानंतर भारतीय बाजारपेठांमध्येही दिसणार आहे. या फोनच्या सीरीजमध्ये Reno 15, Reno 15 Pro,new Reno 15 Mini या तीन मॉडेल्सचा समावेश असणार आहे. अद्याप कंपनीने फोन भारतात कधी लॉन्च होईल याची तारीख सांगितलेली नाही. मात्र समोर आलेल्या अनेक लीक्समधून भारतात हा फोन लॉन्च होताना त्यामध्ये हार्डवेअर आणि डिझाईन अपग्रेड्स असतील याची माहिती देण्यात आली आहे.Oppo Reno 15, Reno 15 Pro कधी येणार?रिपोर्ट्सनुसार, भारतात येणारी Oppo Reno 15 series आकर्षक रंगात सादर केली जातील असे म्हटले जात आहे. Reno 15 हा निळ्या रंगात लाँच होऊ शकतो, तर Reno 15 Pro सोनेरी रंगात सादर केला जाऊ शकतो. दोन्ही मॉडेल्स पांढऱ्या आणि तपकिरी रंगात येण्याची अपेक्षा आहे. टिपस्टर योगेश ब्रार (@heyitsyogesh) यांच्या हवाल्याने स्मार्टप्रिक्सच्या रिपोर्ट्स मधील माहितीनुसार, Oppo Reno 15 सीरीज फेब्रुवारी 2026 पर्यंत भारत आणि इतर ग्लोबल मार्केटमध्ये लाँच होण्याची अपेक्षा आहे. किंमत निश्चित झालेली नाही, परंतु स्टॅन्डर्ड मॉडेलची किंमत सुमारे 43,000 रुपये असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ते अप्पर मिड रेंज सेगमेंट मध्ये येऊ शकतो.
Reno 15 Pro मध्ये 6.78-inch 1.5K AMOLED display असण्याचा अंदाज आहे तर Reno 15 आणि Reno 15 Mini मध्ये 6.59-inch आणि 6.32-inch पॅनल असण्याचा अंदाज आहे. तिन्ही फोन्समध्ये मेटल फ्रेम्स असून त्याला IP68/IP69रेटिंग आहे. फोनमध्ये MediaTek ची Dimensity 8450 chipset आहे तर Reno 15 Pro मध्ये Dimensity 9400 आहे.
फोनमधील कॅमेऱ्याच्या बाबतीत, व्हॅनिला मॉडेलमध्ये 200 मेगापिक्सेल सॅमसंग ISOCELL HP5 प्रायमरी सेन्सर, 50 मेगापिक्सेल अल्ट्रावाइड आणि 50 मेगापिक्सेल पेरिस्कोप लेन्स आणि 50 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असू शकतो. Reno 15 Pro मॉडेलमध्ये 50 वॅट वायरलेस चार्जिंगसह 6500mAh बॅटरी देखील असू शकते
जाहिरात
जाहिरात