Reno 15 series लाइनअप MediaTek Dimensity प्रोसेसरवर चालेल आणि त्यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपचा समावेश असेल अशी माहिती रिपोर्ट्समध्ये समोर आली आहे.
Photo Credit: Oppo
Oppo Reno 15 Series मध्ये Dimensity 8450 चिपसेट असण्याची शक्यता आहे
Oppo Reno 15 सीरीज ही भारतामध्ये लवकरच लॉन्च होण्यासाठी सज्ज आहे. नुकत्याच जारी रिपोर्टमध्ये Reno 15 ची लॉन्च टाईमलाईन आणि काही फीचर्सची माहिती समोर आली आहे. बेस Reno 15 हा Geekbench वर देखील स्पॉट झाला आहे. त्यावर चीपसेटचे काही संकेत मिळत आहेत. Reno 15 series ही Reno 15 Pro,standard Reno 15, आणि नव्या Reno 15 Mini सह येणार आहे. सुरुवातीला, Oppo हे फोन्स Reno 15, Reno 15 Pro, आणि Reno 15 Pro Max या नावांनी सादर करण्याचा विचार करत होते, ज्याचे बेस व्हर्जन लहान पर्याय म्हणून ठेवण्यात आले होते. आगामी मालिकेबद्दल अधिकृत माहिती कमी असली तरी, अहवाल असे दर्शवितात की ही लाइनअप MediaTek Dimensity प्रोसेसरवर चालेल आणि त्यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपचा समावेश असेल.
लीकर सुधांशू अंभोरे यांच्या पार्टनरशीपमध्ये, 91Mobiles ने Oppo Reno 15 लाइनअपची लाँच टाइमलाइन आणि तपशील उघड केले आहेत. 91Mobiles च्या अहवालानुसार, Oppo Reno 15 सीरीज भारतात लाँचिंग डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होईल.
Oppo Reno 15 Series मध्ये Dimensity 8450 चिपसेट असण्याची शक्यता आहे. Geekbench benchmark site वर मॉडेल नंबर PLV110 असलेला ओप्पो डिव्हाइस दिसला आहे - जो base Reno 15 असल्याचे मानले जाते. लिस्टिंगनुसार, फोनमध्ये MediaTek Dimensity 8450 प्रोसेसर आणि Mali-G720 MC7 ग्राफिक्स युनिट आहे.
अलिकडच्या काळात आलेल्या लीक्समुळे Reno 15 Pro आणि Reno 15 Mini च्या इमेजिंग क्षमतेवरही प्रकाश पडला आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा अॅरे असण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये 200MP Samsung ISOCELL HP5 मुख्य सेन्सर, 50MP ultrawide आणि 50MP periscope lenses तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी यामध्ये 50MP फ्रंट-फेसिंग कॅमेरे देखील असू शकतात.
टॉप-टियर व्हेरिएंट, कदाचित Reno 15 Pro, मध्ये 6.78 इंचाचा डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे, तर Reno 15 Mini मध्ये 6.32 इंचाचा स्क्रीन असण्याची शक्यता आहे, दोन्ही 1.5K रिझोल्यूशनसह येतो. Reno 15 मध्ये 6.59 इंचाचा डिस्प्ले असू शकतो. डिव्हाइसेसमध्ये मेटल फ्रेम्स देखील असू शकतात आणि धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP68 आणि IP69 प्रमाणपत्रे असू शकतात.
जाहिरात
जाहिरात
Dyson Purifier Hot+Cool HP2 De-NOx, Purifier Hot+Cool HP1 Launched in India: Price, Features