Oppo ने जागतिक बाजारात Reno 16 आणि Reno 16F स्मार्टफोन लॉन्च
कंपनीने Oppo Reno 16 सीरिज जागतिक बाजारात लाँच केली असून या सीरिजअंतर्गत तीन स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत. या सीरिजमध्ये Oppo Reno 16, Reno 16F आणि Oppo Reno 16 Pro 5G यांचा समावेश आहे. Oppo Reno 16 Pro 5G हा या सीरिजमधील टॉप व्हेरिएंट असून त्याची संपूर्ण स्पेसिफिकेशन्स काही प्रमाणात वेगळी आहेत. Oppo Reno 16 आणि Oppo Reno 16F बद्दल बोलायचे झाल्यास, Oppo Reno 16 मध्ये 6.32 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन Snapdragon 7 Gen 4 चिपसेटसह येतो. यात 120Hz रिफ्रेश रेट दिला आहे. तर Oppo Reno 16F मध्ये 6.57 इंचाचा Crystal Guard AMOLED डिस्प्ले मिळतो. या फोनमध्ये MediaTek Dimensity 7300-Energy चिपसेट देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या दोन्ही स्मार्टफोनची महत्त्वाची फीचर्स आणि त्यांची किंमत.
Oppo Reno 16c किंमत
कंपनीने Oppo Reno 16 5G सीरिज थायलंड आणि मलेशियासारख्या बाजारात लाँच केली आहे. Oppo Reno 16 च्या 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत THB 19,999 (सुमारे 56,000 रुपये) आहे. तर 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत THB 22,999 (सुमारे 65,000 रुपये) आहे. हा फोन Pop White, Twilight Violet आणि Dream Purple या रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Oppo Reno 16F किंमत
Reno 16F 5G दोन RAM आणि स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत THB 15,999 (सुमारे 45,000 रुपये) आहे. तर 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत THB 16,999 (सुमारे 48,000 रुपये) आहे. हा फोनही Pop White, Twilight Violet आणि Dream Purple या रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Oppo Bubble Mag E-Badge डिस्प्ले
Oppo Reno 16 सीरिजमध्ये कंपनीने खास Oppo Bubble Mag E-Badge Display दिला आहे. हा मॅग्नेटिक स्मार्ट डिस्प्ले असून तो ColorOS सोबत कार्य करतो. हा डिस्प्ले फोनच्या बॅक पॅनलला चुंबकीय पद्धतीने जोडला जातो. यामध्ये रिअर कॅमेऱ्याचा प्रीव्ह्यू पाहता येतो, त्यामुळे सेल्फी आणि ग्रुप फोटो काढणे अधिक सोपे होते.
Oppo Reno 16 स्पेसीफिकेशन
Oppo Reno 16 हा या सीरिजमधील स्टँडर्ड व्हेरिएंट असून, यात कॉम्पॅक्ट 6.32 इंचांचा डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये AMOLED पॅनल असून तो 1.5K रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. तसेच, यात 120Hz रिफ्रेश रेट आणि 1800 निट्स पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. या फोनमध्ये Snapdragon 7 Gen 4 चिपसेट असून त्यासोबत LPDDR5X RAM आणि UFS 3.1 स्टोरेज मिळते.
Oppo Reno 16 च्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, फोनच्या मागील बाजूस 50MP मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यामध्ये 2-अॅक्सिस OIS सपोर्ट आहे. मुख्य कॅमेऱ्यासोबत 50MP अल्ट्रावाइड कॅमेरा मिळतो. तिसरा सेन्सर 50MP पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स असून, त्यात 3.5x ऑप्टिकल झूम आणि OIS फीचरचा सपोर्ट आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 50MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, जो ऑटोफोकस फीचरसह येतो. फोनमध्ये 6,700mAh ची मोठी बॅटरी असून, 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट मिळतो.
Oppo Reno 16F स्पेसीफिकेशन
Oppo Reno 16F मध्ये 6.57 इंचांचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा Crystal Guard प्रोटेक्शनसह AMOLED पॅनल असून फुल HD+ रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 1400 निट्स पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. प्रोसेसर म्हणून यात MediaTek Dimensity 7300-Energy चिपसेट वापरण्यात आला आहे.
Oppo Reno 16F हा या सीरिजमधील सर्वात मोठ्या बॅटरीसह येणारा स्मार्टफोन आहे. यात कंपनीने 7000mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली असून, 80W फास्ट चार्जिंगचा सपोर्टही आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास, फोनच्या मागील बाजूस 50MP मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यामध्ये 2-अॅक्सिस OIS सपोर्ट मिळतो. यासोबत 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. तिसरा सेन्सर 50MP पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स असून, त्यात 3.5x ऑप्टिकल झूम आणि OIS सपोर्ट आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MP ऑटोफोकस फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
जाहिरात
जाहिरात
Vivo X Fold 6 Launched With 7,000mAh Battery, 8.02-Inch Samsung M14 Foldable Display: Price, Specifications