Pixel 10 मध्ये 48MP primary sensor,10.8MP telephoto lens सोबत 5x zoom आणि 13MP ultrawide shooter सोबत 10.5MP front-facing camera आहे
Photo Credit: Google
गुगल पिक्सेल १० मालिका भारतात फ्लिपकार्टद्वारे उपलब्ध होईल
Google ने भारतात Pixel 10 series च्या लॉन्चची घोषणा केली आहे. यामध्ये चार स्मार्टफोन्सचा समावेश आहे. गूगलने दिलेल्या माहिती मध्ये त्यात Pixel 10, Pixel 10 Pro, Pixel 10 Pro XL, आणि Pixel 10 Pro Fold हे स्मार्टफोन असणार आहेत. Pixel 10 series मधील सर्व मॉडेल्स Titan M2 security सह इन-हाऊस Tensor G5 chipset वर चालतात. Pro आणि Pro XL मध्ये 50MP main cameras, 42MP selfie shooters यांचा समावेश आहे. Pixel 10 आणि Pro मध्ये telephoto lens सोबत 5x optical zoom चा समावेश आहे.
Google Pixel 10 Series मधील Pixel 10 च्या बेस मॉडेलची (256 GB) किंमत 79,999 रूपये आहे. हा स्मार्टफोन Indigo, Frost, Lemongrass, आणि Obsidian रंगांमध्ये उपलब्ध आहे. Pixel 10 Pro ची किंमत 1,09,999 रुपये आहे, तर Pixel 10 Pro XL ची किंमत 1,24,999 रुपये आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये 256 जीबी स्टोरेज आणि जेड, मूनस्टोन आणि ऑब्सिडियनसह रंगात आहेत. Pro मॉडेल मध्ये अतिरिक्त Porcelain फिनिश आहे. सर्व Pixel 10 Series स्मार्टफोन भारतात केवळ फ्लिपकार्ट द्वारे विकले जातील.
Google Pixel 10 मध्ये 6.3 full-HD+ OLED Super Actua display आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्झ, पीक ब्राइटनेस 3000 निट्स आणि फ्रंट आणि बॅक दोन्ही बाजूंना Gorilla Glass Victus 2 protection आहे. हा फोन 3nm Tensor G5 SoC वर चालतो जो Titan M2 security chip, 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह येतो.
Pixel 10 मध्ये 48MP primary sensor,10.8MP telephoto lens सोबत 5x zoom आणि 13MP ultrawide shooter सोबत 10.5MP front-facing camera आहे. डिव्हाइसला पॉवर देणारी 4970mAh बॅटरी आहे ज्यामध्ये 30 वॅट फास्ट चार्जिंग, 15W Qi2 वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. यात व्हेपर कूलिंग चेंबर, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, 5G, eSIM, NFC, Bluetooth 6, Wi-Fi, आणि USB Type-C connectivity आहे.
Google Pixel 10 Pro मध्ये 6.3 इंचाचा Super Actua LTPO display आहे जो 1,280×2,856 रिझोल्यूशन देतो, तर मोठ्या पिक्सेल 10Pro XL मध्ये 1,344×2,992 रिझोल्यूशनसह 6.8 इंच एलटीपीओ पॅनेल आहे. दोन्ही मॉडेल्स 120 हर्ट्झ पर्यंत रिफ्रेश रेट, 3,000 निट्सची पीक ब्राइटनेस आणि दोन्ही बाजूंना गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 संरक्षणाला सपोर्ट करतात. टेन्सर G5 चिपसेटद्वारे सपोर्ट असलेला, प्रो मॉडेल्समध्ये 16 जीबी रॅम आहे, जे standard Pixel 10च्या तुलनेत अधिक मल्टीटास्किंग आणि परफॉर्मन्स अपग्रेड देतात.
जाहिरात
जाहिरात