नवीन अपडेटमध्ये 'Wicked for Good' या आगामी हॉलिवूड चित्रपटासाठी खास थीम पॅकसह अनेक नवीन एआय वर आधारित फीचर्स आली आहेत
Photo Credit: Google
Nano Banana मॉडेल सेल्फीला 3D अॅनिमेशनमध्ये रूपांतरित करते
Google कडून एक नवं फीचर Pixel Feature Drop आणण्यास सुरूवात केली आहे. हे एक सॉफ्टवेअर अपडेट आहे जे पिक्सेल फोन, टॅब्लेट, इअरबड्स आणि घड्याळांना नवीन आणि अपग्रेड केलेले फीचर्स देते. नोव्हेंबर पिक्सेल ड्रॉपमध्ये कम्युनिकेशन्स, फोटोग्राफी आणि बॅटरी लाइफसाठी अनेक बदल समाविष्ट आहेत. प्रमुख जोडण्यांमध्ये “Wicked: For Good” थीम पॅक, मेसेजेसमध्ये फोटो “Remix” एडिटर, मोठ्या संभाषणांसाठी AI summaries, गुगल फोटोजमध्ये पर्सनलाईज्ड एडिट्स आणि गाडी चालवताना गुगल मॅप्ससाठी पॉवर सेव्हिंग मोड यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, हे अपडेट Journal app ची उपलब्धता जुन्या पिक्सेल फोनसाठी वाढवते कारण पूर्वी ते Pixel 10 series साठीच होते.
नोटीफिकेशनसाठी Conversation summaries आहेत जे Pixel डिव्हाइसेस आता मोठे मेसेजेस आणि ग्रुप चॅटसाठी लहान एआय सारांश तयार करू शकतील आणि ते सारांश notification shade मध्ये दाखवू शकतील. हे summary feature फक्त Pixel 9 आणि त्याहून नवीन (Pixel 9a वगळता) वर उपलब्ध असेल.
गुगल मेसेजेसमध्ये Nano Banana संचालित Remix feature सह एक क्रिएटिव्ह अपग्रेड देखील मिळत आहे. Pixel 6 आणि त्यावरील आवृत्तीसाठी तसेच निवडक प्रदेशांमधील इतर अँड्रॉइड डिव्हाइससाठी उपलब्ध असलेले रीमिक्स यूजर्सना चॅट थ्रेडमध्ये थेट फोटो एडिट करण्यास आणि पुन्हा कल्पना करण्यास सक्षम करते. हे फीचर गुगलच्या व्हायरल इमेज जनरेशन मॉडेल, Nano Banana वापरते, जे सोशल मीडियावर भारतीय यूजर्सना विशेषतः आवडते. हे अपडेट तुम्ही चॅट सोडल्याशिवाय एआय फोटो एडिट करण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी वापरू शकाल.
Pixel 10 series च्या यूजर्सना गुगल मॅप्समध्ये बॅटरी सेव्हिंगचा एक नवीन पर्याय मिळतो. नेव्हिगेशन दरम्यान पॉवर बटण दाबून, यूजर्स सोप्या ट्रिप लेआउटवर स्विच करू शकतात, ज्याच्या बॅटरीचे आयुष्य चार तासांपर्यंत वाढू शकते असा गुगलचा दावा आहे. हे फीचर प्रवाशांसाठी आहे जे रस्त्यावर बराच काळ त्यांच्या डिव्हाइसवर अवलंबून राहतात.
इतर अपडेट्समध्ये कॉल नोट्स, डिव्हाइस हेल्थ अँड सपोर्ट आणि पिक्सेल जर्नलचा अतिरिक्त पिक्सेल मॉडेल्समध्ये विस्तार, अॅक्सेसिबिलिटी सुधारणा आणि नवीन साऊंड ऑप्शंन्सचा समावेश आहे. Google Photos मधील एडिट्स, जे आधीच पात्र यूएस यूजर्ससाठी उपलब्ध आहेत, आता फेस ग्रुप्सवर आधारित अनुकूलित अॅडजस्टमेंट्सना परवानगी देत आहेत
जाहिरात
जाहिरात