फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये Poco M7 सिरीजची देखील किंमत कमी होणार आहे. स्टँडर्ड Poco M7 5G ची किंमत आता 8,799 रूपये असेल.
Photo Credit: Poco
फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल २०२५ मध्ये Poco M7 Plus 5G सवलतीत मिळेल
Flipkart चा Big Billion Days Sale 2025 हा 23 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. सेलपूर्वीच पोकोने आपल्या वेगवेगळ्या प्राईज सेगमेंटमधील स्मार्टफोन मॉडेल्सवर ऑफर्स जाहीर केल्या आहेत.फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 2025 मध्ये Poco F7 5G वर खास सवलत मिळणार आहे. बेस 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट 31,999 रूपये ऐवजी आता 28,999 रूपये मध्ये उपलब्ध होईल. तर उच्च श्रेणीतील 12GB RAM + 512GB स्टोरेज मॉडेल, ज्याची लाँचिंग किंमत 33,999 रूपये होती, त्यावरही ऑफर दिली जाण्याची शक्यता आहे. 1 जुलै रोजी भारतात लाँच झालेल्या या स्मार्टफोनमध्ये 7,550mAh ची दमदार बॅटरी असून ती पॉवर युजर्ससाठी दीर्घकाळ वापराची सुविधा देते.
Poco X7 सिरीजवरही सेलदरम्यान मोठ्या सवलती मिळणार आहेत. स्टँडर्ड पोको X7 5G फक्त 14,499 रूपयांमध्ये उपलब्ध होईल, तर Poco X7 Pro 5G ची किंमत 19,999 रूपये ठेवण्यात आली आहे. या किंमतींमध्ये बँक ऑफर्स आणि इतर प्रोमोशनल ऑफर्सचा समावेश आहे. दोन्ही फोनमध्ये 6,550mAh बॅटरी मिळते. हे स्मार्टफोन जानेवारी 2025 मध्ये लाँच झाले होते, ज्यात स्टँडर्ड X7 ची किंमत 21,999–23,999 रूपये, तर X7 प्रो ची किंमत 27,999–29,999 रूपये होती.
फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये Poco M7 सिरीजची देखील किंमत कमी होणार आहे. स्टँडर्ड Poco M7 5G ची किंमत लाँच दरातील 9,999–10,999 रूपये वरून कमी होऊन आता 8,799 रूपये असेल. यात Snapdragon 4 Gen 2 चिपसेट आणि 5,160mAh बॅटरी मिळते. M7 Pro 5G मध्ये 14,999–16,999 रूपये वरून कमी होऊन आता 11,499 रूपये मध्ये उपलब्ध होईल. यात MediaTek Dimensity 7025 Ultra SoC आणि 5,110mAh बॅटरी दिली आहे. तर M7 Plus 5G ची किंमत 13,999–14,999 रूपये वरून कमी होऊन आता 10,999 रूपये असेल. या मॉडेलमध्ये Snapdragon 6s Gen 3 चिपसेट आणि 7,000mAh बॅटरी मिळणार आहे.
फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 2025 पोको स्मार्टफोन खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक ठरणार आहे. या सेलमध्ये हाय-एंड F7 5G, मिड-रेंज X7 सिरीज आणि बजेट-फ्रेंडली M7 लाइनअप वर मोठ्या सवलती मिळतील.
जाहिरात
जाहिरात