Poco F8 प्रो आणि Poco F8 अल्ट्रा दोन्ही फोन्स HyperOS 3-based Android 16 वर चालण्याचा अंदाज आहे.
Photo Credit: Poco
पोकोने अखेर पोको एफ८ मालिकेच्या लाँचिंग तारखेची पुष्टी केली आहे.
Poco ने 26 नोव्हेंबर रोजी त्यांचा पुढील ग्लोबल लाँच कार्यक्रम आयोजित केला आहे. इंडोनेशिया मधील बाली येथे स्थानिक वेळ संध्याकाळी 4 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. कंपनी त्यांच्या F-series अंतर्गत नवीन मॉडेल्स लाँच करत आहे आणि आतापर्यंत शेअर केलेल्या माहितीवरून असे दिसते की, Poco F8 Pro आणि Poco F8 Ultra हे दोन्ही स्मार्टफोन लक्ष वेधून घेतील. F8 सीरीज मध्ये तीन मॉडेल्स असतील, म्हणजे Poco F8, Poco F8 Pro आणि F8 Ultra. दरम्यान F8 26 नोव्हेंबरच्या कार्यक्रमात अधिकृत होण्याची शक्यता कमी आहे. या कार्यक्रमात फक्त F8 प्रो आणि F8 अल्ट्रा लॉन्च होण्याचा अंदाज आहे.रिपोर्ट्सनुसार, Poco F8 Pro आणि F8 Ultra हे चीनमध्ये नुकतेच लाँच झालेल्या Redmi K90 आणि K90 Pro Max च्या सुधारित आवृत्त्या असतील.Poco मॉडेल्समध्ये त्यांच्या रेडमी काऊंटरपार्ट सारख्याच डिझाइन आणि इंटरनल असतील, तर F8 Pro आणि F8 Ultra मध्ये K90 आणिK90 Pro Max पेक्षा तुलनेने लहान बॅटरी असतील असे म्हटले जाते.
Poco F8 मध्ये 6.59-inch OLED display असण्याचा अंदाज आहे तर F8 Ultra मध्ये 6.9-inch OLED panel आहे. दोन्ही फोन्स 1.5K resolution आणि 120Hz refresh rate सह येण्याचा अंदाज आहे. तसेच हे दोन्ही फोन्स HyperOS 3-based Android 16 वर चालण्याचा अंदाज आहे.
Poco F8 मध्ये Snapdragon 8 Elite तर F8 Ultra स्मार्टफोनमध्ये 8 Elite Gen 5 चीपसेटचा समावेश आहे. Pro मॉडेलच्या मागील कॅमेरा सेटअपमध्ये OIS सह 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2x ऑप्टिकल झूमसह 50 मेगापिक्सेलचा टेलीफोटो कॅमेरा असेल.
POCO F8 Pro हा Redmi K90 चा रिब्रँडेड फोन असू शकतो. जर असं असेल तर तो 6.59-इंचाचा OLED डिस्प्ले, तसेच Snapdragon 8 Elite SoC सह येऊ शकतो. फोटोग्राफीसाठी, यात 50MP चा मुख्य सेन्सर, 50MP चा टेलिफोटो लेन्स आणि 8MP चा अल्ट्रावाइड कॅमेरा असू शकतो.
F8 अल्ट्रामध्ये नेहमीच्या वरच्या आणि खालच्या स्पीकर व्यतिरिक्त एक अतिरिक्त मागील स्पीकर असण्याची अपेक्षा आहे. दोन्ही फोन 100W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करतील अशी शक्यता आहे, तर अल्ट्रा एडिशनमध्ये 50W वायरलेस चार्जिंग देखील मिळेल.
जाहिरात
जाहिरात